हृदयरोग आणि स्त्री असे
म्हटले की स्त्रियांना सर्वसाधाराणपणे हृदयरोग होत नाही असे म्हटले जाते . हे काही प्रमाणात खरे आहे .ते कसे ?
ईस्ट्रोजेन हे एक स्त्री
विशीष्ठ हार्मोन आहे . या हार्मोनची निर्मिती चाळीशीनंतर हळूहळू
कमी होते व मेनोपॉजनंतर (मासिक पाळी गेल्यानंतर )तर अगदीच कमी
होते. हे ईस्ट्रोजेन हृदयसंरक्षक समजले जाते . खर तर याचं काम या बाबतीत नक्की कसं चालतं हे पूर्णपणे समजलेले नाहीये , पण LDL हे हृदयासाठी वाईट समजले जाणारे कोलेस्टेरॉल
इस्ट्रोजेनमुळे नियंत्रणात राहाते . इस्ट्रोजेनमुळे रक्तवाहीनीचे
आतले अस्तर ( endothelium) याचे स्वास्थ्य ईस्ट्रोजेनमुळे टिकून
राहाते . त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहीन्यांचा आजार (blockages ) अडथळे निर्माण होत
नाहीत . आता पाळी गेल्यावर रक्तवाहिन्यांचे हे संरक्षण
नाहीसे होते आणि हृदय रोगाची शक्यता स्त्रियांना पुरुषाएवढीच वाढते .
दुसरं असं की वैद्यकीय जगतात जे हृदय रोगावर संशोधन झाले ते नाईलाजाने पुरुषप्रधान
होते . म्हणजे संशोधनासाठी जे स्वयंसेवक येत असत ते जास्त प्रमाणात
पुरूष असतं (सामाजिक मर्यादेमुळे ) त्यामुळे
फक्त स्त्रियांचा संशोधनासाठी असा विचार केला गेला तो जे खास स्त्रियांचे आजार असतात
त्यासाठीच . स्त्रियांच्या रक्तदाब मधुमेह हृदयरोग याबाबतीत वेगळा डेटा अनेक वर्षे नव्हताच.
अलीकडे अशी स्त्रियांबाबत माहिती गोळा केली जाऊ लागली .
आपण वर पहिले की मेनोपॉज नंतर स्त्रियांना नी
पुरुषांना सारख्याच प्रमाणात हृदयरोगाची शक्यता असते .
मात्र स्त्रियांचा
हृदयरोग थोडा वेगळ्या स्वरूपात होते .
1 अंजायनाचा (
चालल्यानंतर छातीत दुखणे ) त्रास झाल्यानंतर angiography केली
तर Non Obstructing Coronary Disease चे प्रमाण स्त्रियांमधे
जास्त सापडते . (म्हणजे ब्लॉकेजेसचे प्रमाण 60% पेक्षा कमी असते )
2
तसेच चालल्यावर दम लागणार्या
आणि हार्ट फेल्युअरची लक्षणे असणार्या स्त्रियांची हृदयाची सोनोग्राफी केली (2d echo ) तर हृदयाची
पंपिंग क्षमता मात्र नॉर्मल सापडते , याला वैद्यकीय भाषेत
heart failure with preserved ejection fraction असे म्हटले जाते
.
त्रास
होतोय हार्ट फेल्युयर आहे पण अशा स्त्रीचे रिपोर्ट असे जवळजवळ नॉर्मल आल्यानंतर बरेचदा ट्रीटमेंट कडे गांभिर्याने
पाहीले जात नाही कधी कधी डॉक्टर सुद्धा ६०% पेक्षा कमी ब्लॉकेजेस आहेत म्हटल्यावर बाकी
काहीच बोलत नाही .त्यामुळे स्त्रियांच्या हृदयरोगाकडे
दुर्लक्ष केले जाते पण अशा वेळेस जीवनशैली
सुधारणा तातडीने केली पाहीजे. हृदयरोग झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा
तो होऊ नये म्हणून जास्त काळजी घेतली पाहीजे . मग असा काही आरोग्याचा
मापदंड आहे का की तो लाऊन आपले हृदयाचे आरोग्य किती चांगले आहे किंवा किती धोक्यात
आहे ? हे कसे तपासता येईल ? हो. त्या निमित्ताने खास स्त्रियांवर झालेल्या संशोधनाचा
आढावा सांगणं खूप महत्त्वाचे वाटतय .
शिकागो युनिव्हर्सिटीत
एक सेंट जेम्स टेक हार्ट नावाचा एक प्रोजेक्ट राबवला गेला . त्यात
५० शीच्या आसपासच्या 5721 स्त्रियांनी भाग घेतला . नी पुढे आठ वर्षे या स्त्रियांच्या आरोग्याचा पाठपुरावा केला गेला
. त्यातल्या एकदोनच महत्त्वाच्या गोष्टी मी येथे नमूद करते. या सर्व स्त्रियांची व्यायामक्षमता मेट (MET ) मधे मोजली
. म्हणजेच त्यांची स्ट्रेस टेस्ट केली( ट्रेडमिल टेस्ट ) . या सर्व स्त्रियांना कोणताही त्रास होत नव्हता. तेंव्हा
खालील गोष्टी लक्षात आल्या.
ज्या स्त्रियांची
व्यायामक्षमता 8 मेट आणि त्यापेक्षा जास्त होती त्यांच्यामधला पुढच्या 8 वर्षातला मृत्यूदर सगळ्या कमी होता .
ज्या स्त्रियांची
व्यायामक्षमता 5 मेटपेक्षा कमी होती त्यांच्यात पुढच्या 8 वर्षातला मृत्यूदर
सगळ्यात जास्त होता .
तुम्हाला
सगळ्यांना माहीत आहे की मधुमेह ऊच्चरक्तदाब वाढलेलं वजन वाढलेलं कोलेस्टेरॉल ही हृदयरोगाची कारणे आहेत . पण हे आजार असणार्या स्त्रिची व्यायामक्षमता
जर 8 मेट असेल तरीही तीचा धोका कमी असतो . म्हणजे तुमची मेट ची क्षमता हा तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा मापदंडच झाला
.
मग या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर असे वाटते की ४० नंतरच्या प्रत्येक स्त्रीने ही स्ट्रेस
टेस्ट करून घ्यावी 8 मेटच्या खाली क्षमता असणार्या स्त्रीयांनी डॉक्टरांच्या मदतीने त्याची कारणे
शोधावी आणि त्या कारणांवर काम करावे ( कारणे - व्यायामाचा अभाव ,वाढलेलं वजन , हीमोग्लोबीन कमी असणे, उच्चरक्तदाब व रक्तातली साखर बराच
काळ वाढलेली असणे )
आज स्त्री दिनानिमित्त आपला हृदयाच्या
आरोग्याचा मापदंड जागेवर आहे की नाही हे तपासून
पहावा . आणि तो जर 8 मेट पेक्षा कमी असेल तर वैद्यकीय
सल्ल्याने त्याची करणे शोधून ती दूर करावीत. ही मेट मधली क्षमता ट्रेडमिल टेस्ट
करून कळते.
धन्यवाद
डॉ. आनंदी साठये
B.A.M.S, M.D.
8975394110