शनिवार, १८ एप्रिल, २०२६

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

 


डॉक्टर रोहित साने .

                            काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ," डॉक्टर मला ब्लॉकेजेस सांगितले आहेत . सगळेजण लगेच अँजिओप्लास्टि कर म्हणत आहेत . मला ऑपरेशन ची खूप भीती वाटते.

                           आजवर माझ्याकडे आलेल्या अनेक रुग्णांमध्ये मी हीच भावना पुनः पुन्हा पहिली आहे. 

                           आपल्याला हृदयविकार आहे किंवा अँजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस आढळले आहेत असे कळताच रुग्ण अक्षरशः हदारतो. 

                          " आपल्याला हार्ट अटॅक येईल का ? , आपण वाचू का ?? या भीतीने तो पूर्ण घाबरून जातो . खरे सांगायचे तर ही त्या एकटयाचीच कथा नाही तर आजवर भेटलेल्या शेकडो रुग्णांची हीच गोष्ट आहे . घरच्यांचा दबाव , समाजाचे बोलणे आणि "लगेच स्टेन्ट टाका " हा सल्ला यामुळे रुग्ण घाईघाईत निर्णय घेतो . पण त्यानंतर सुरू होतो एक वेगळाच प्रवास . औषधे ,सततचा खर्च आणि मनावरचे दडपण . ही सगळे अनुभवताना मला वारंवार एकच प्रश्न पडत राहीला  , की खरंच  हा अंतिम उपाय आहे का ??, की आपण मूळ कारणाकडे दुर्लक्ष करत आहोत ? प्रत्येक ब्लॉकेज  म्हणजे स्टेन्ट असे नसते . हा निर्णय घाईत घेण्यासारखा नाही समजून घेण्यासारखा आहे . 

                        मी स्वत: या विषयावर खूप अभ्यास केला . अनेक रुग्णांचे अनुभव पहिले . अँजिओप्लास्टि या विषयावर जगभरात झालेल्या मोठ्या संशोधानांचा अभ्यास केला . 

                        The Lancet आणि New England Journal of Medicine या नावांच्या मासिकामध्ये प्रकाशित झालेले दोन  संशोधने  महत्वाची  आहेत . 

                        ORBITA आणि   ISCHEMIA - या दोन्ही संशोधनानी एक वेगळाच दृष्टिकोण दिला . खरंतर अँजिओप्लास्टि संबंधित अनेक संशोधने करण्यात आली आहेत . COURAGE trial , BARI 2 D study ... पण आता मी तुम्हाला प्रथम ORBITA संशोधना  विषयी समजवतो . या सगळ्या संशोधानांचा एकच उद्देश होता , अँजिओप्लास्टि करून रुग्णांच्या आयुष्यात किती फरक पडतो ही समजून घेणे . तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो की ही संशोधने नेमकी के सांगतात .

ORBITA 

                      हे  संशोधन 2017 साली प्रकाशित झाले आणि त्याने जगभरात चर्चा निर्माण केली . या संशोधनात 70 % 80% ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांना दोन गटात विभागले . एक गटाला अँजिओप्लास्टि केली तर दुसऱ्या गटाला फक्त औषधे दिली . विशेष म्हणजे औषधोपचार घेणाऱ्या दुसऱ्या गटाला sham किंवा फेक प्रक्रिया केली गेली ,म्हणजे आपल्यावर ब्लॉकेजेस साठि काहीतरी प्रोसीजर केली गेली आहे असे त्यांना भासवले . 

                     आता तुम्ही विचार कर जर स्टेन्ट टाकणे हा खरेच सर्वोत्तम उपाय असेल तर स्टेन्ट केलेल्या गटात मोठा फरक दिसायला  हवा होता . काही आठवडयानंतर जेंव्हा दोन्ही गटांचा अभ्यास केला गेला , तेंव्हा छातीत दुखणे कमी होण्यामध्ये दोन्ही गटांमध्ये जवळजवळ समान परिणाम दिसले . म्हणजेच स्टेन्ट केल्यावरच फक्त आराम मिळतो असे नाही तर योग्य औषधोपचार आणि जीवनशैली बदलली तरी तितकाच फरक पडू शकतो . हा निष्कर्ष खूप महत्वाचा होता . कारण याने आपली विचार करण्याची दिशा बदलली . 

                      यानंतर मी ISHCEMIA संशोधनाचा अभ्यास केला . हे  संशोधन आणखी मोठे आणि दीर्घकालीन होते . यात हजारो रुग्णांचा समावेश करण्यात आला . या रुग्णांमध्ये मध्यम ते गंभीर ISHCEMIA होता , म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी पडत होता . एका गटाला फक्त औषध आणि जीवनशैली बदल दिले गेले ., तर दुसऱ्या गटाला अँजिओप्लास्टि किंवा बायपास सोबत औषधे दिली गेली . काही वर्षानी जे निष्कर्ष समोर आले ते अजूनच विचार करायला लावणारे  होते .हार्ट अटॅक किंवा मृत्यू टाळण्यात दोन्ही गटात विशेष फरक दिसून आला नाही. म्हणजेच प्रत्येक रुग्णाचे ऑपरेशन केल्यानेच आयुष्य वाचेल किंवा त्रास कमी होईल असे नाही . 

                     इथेच मी माझ्या रुग्णांना एक गोष्ट नेहेमी सांगतो घाबरून निर्णय घेऊ नका . करण रिपोर्ट मध्ये जरी ब्लॉकेजेस दिसत असले तरी शरीराची खरी अवस्था त्यापेक्षा वेगळी असते . मी अनेक वेळा पहिले आहे दोन रुग्णांमध्ये समान ब्लॉकेजेस असतात पण एकाला काही त्रास नसतो , आणि दुसऱ्याला खूप त्रास असतो . मग निर्णय फक्त रिपोर्ट वर कसा घेणार ? इथे आपल्याला समजून घ्यावे लागते हृदयाला खरंच किती रक्त कमी पडतंय ? लक्षणे किती आहेत आणि बाकीची शरीराची स्थिति काय आहे ?/

                       मी नेहेमी सांगतो हृदयरोगाचा मूळ प्रश्न फक्त ब्लॉकेजेस नसतो तर आपली जीवनशैली हा मूळ प्रश्न असतो . चुकीचा आहार , व्यायामाचा अभाव , सततचा ताण , अपुरी झोप या सगळ्याच गोष्टी  हळूहळू हृदयावर परिणाम करत असतात . आणि आपण फक्त ब्लॉकेजेस काढण्यावर लक्ष्य देतो पण या कारणांकडे दुर्लक्ष करतो मग काही महिन्यांनी / वर्षानी तोच प्रश्न समोर येतो . 

                        आता तुम्ही विचाराल मग काय करायच ? मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगतो  जर आपण काही गोष्टी बदलल्या तर मोठा फरक पडू शकतो . योग्य आहार म्हणजे तेलकट पदार्थ , जास्त मीठ आणि साखर या गोष्टी कमी करणे . नियमित व्यायाम म्हणजे अगदी साध  चालणे सुरू केले तरी चालते . तणावाचे नियोजन , कारण ताण हा हृदयाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. वजन नियंत्रण , पुरेशी झोप या सगळ्या गोष्टी मिळून हृदयाला बळ देतात . 

                          मी अनेक रुग्णांमध्ये असे बदल करून पहिले आहेत खरोखर त्याचा परिणाम दिसतो . हृदयाची कार्यक्षमता सुधारते , ब्लॉकेजेस वाढण्याचा वेग कमी होतो , बरेचदा ऑपरेशन टाळणेही शक्य होते . म्हणूनच मी नेहेमी सांगतो स्टेन्ट टाकणे हा एक पर्याय आहे पण तो एकमेव पर्याय नाही . 

                         हजारो वर्षांपासून आपल्याला लाभलेल्या आयुर्वेदात सांगितलेल्या पंचकर्मावर आधारित विनाशस्त्रक्रिया शरीर आणि हृदय शुद्धीकरण कसे करावे याची माधवबागेने योग्य अशी मांडणी केली आहे . ज्याचा आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक रुग्ण फायदा घेऊन स्वताला हृदयविकाराच्या भीतीपासून पूर्णता: मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहेत.  ही विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ब्लॉकेजेस सारख्या गंभीर आजारावर कशी काम करते  ही मी तुम्हाला पुढच्या लेखात सविस्तर सांगेन . 

                         शेवटी एकच सांगावेसे वाटते , प्रत्येक रुग्ण वेगळा असतो आणि प्रत्येक निर्णयही वेगळा असायला हवा . घाईत घेतलेला निर्णय आयुष्यभराचा ठरू शकतो पण योग्य माहितीवर , शांतपणे घेतलेला निर्णय आयुष्य वाचवू शकतो . म्हणून तुम्हालाही असा गोंधळ वाटत असेल , तर थांबा , समजून घ्या , आणि मग निर्णय घ्या . कारण कधी कधी  संयम हा सगळ्यात मोठा उपचार ठरतो ,

                         तुम्हालाही ऑपरेशनच्या भीतीपासून दूर राहून निरोगी आयुष्य जगायचे असेल , तर ऑपरेशनचा  विचार करण्यापूर्वी एकदा माधवबागेच्या तज्ञ डॉक्टरना नक्की भेटा . 

डॉ . रोहीत  साने 

MD . CEO MADHAVBAUG

नाशिक सेंट्रल माधवबाग 

9226403518 


 . 

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

कोलेस्टेरॉल आणि रक्तवाहिन्या







कोलेस्टेरॉल आणि रक्तवाहिन्या


ब्लॉकेजेस होण्यासाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी एक घटक म्हणजे कोलेस्टेरॉल . पण हा कोलेस्टेरॉल वाढलेला असणे म्हणजे ब्लॉकेजेस होणारच किंवा हार्ट अटॅक येणारच अशी गैरसमजूत असलेला हा महत्वाचा घटक .

कोलेस्टेरॉल म्हणजे नक्की काय ?

आपण कोलेस्टेरॉल चेक करतो म्हणजे रक्तातले लिपिड प्रोफाइल चेक करतो .

कोणकोणते घटक असतात त्या लिपिड प्रोफिले मध्ये ? आणि त्याची नॉर्मल नव्हे तर अपेक्षित आदर्श रेंज काय असते ते आधी पाहू .

  1. TOTAL CHOLESEROL < 200mg /dl
  2. LDL ( low density lipoprotein ) < 100 mg /dl
  3. HDL ( high density lipoprotein) -पुरुष >40 mg /dl
  4. Triglycerides < 150 mg/dl
  5. VLDL ( very low density lipoprotein )

यात HDL नावाचा घटक म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल समजले जाते तर LDL आणि triglycerides हे वाईट समजले जातात .हि झाली प्राथमिक माहिती .

कोलेस्टेरॉल चांगले किंवा वाईट असे का असते ?

वाईट म्हणजे ते शून्य हवे का ? किंवा वाईट कोलेस्टेरॉल हे पूर्णपणे वाईटच असते का ?

हे समजून घेण्यासाठी आपण लिपिड प्रोफाइल म्हणजे काय व त्यातील घटकांचे आपल्या शरीरात काय काम असते ते पाहू.


  • ट्रायग्लिसेराईड्स -फॅटी ऍसिड +ग्लिसरॉल . ट्रायग्लिसेराईड्स म्हणजे मेदाचा साठा होय . आपण जे कार्बोहायड्रेट आणि फॅट आहारातून घेतो ते सगळे लगेच वापरले जात नाहीत अतिरिक्त असलेले साठवले जातात . अतिरिक्त साखरेचेही रूपांतर फॅटी ऍसिड मध्येच होते .अन्न नसेल तेंव्हा या साठ्यापासून शरीराला इंधन पुरविले जाते . तसेच अवयवाभोवती असलेल्या मेदाच्या आवरणामुळे त्या अवयवाचे रक्षण होते , तापमान उबदार राहण्यास मदत होते . चरबीमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन्स चे वहन हे ट्रायग्लिसेराईड्स मधूनच होत असते.
  • लिपोप्रोटीन - लिपिड ( मेद ) आणि प्रोटीन ( प्रथिन ) मिळून बनलेला असतो .ते VLDL ,LDL ,HDL , या तीन प्रकारचे असे हे आपण वर पाहीले .
  • VLDL - हे ट्रायग्लिसेराईड्सना यकृतातून रक्तातून स्नायूंपर्यंत नेण्याचे काम करतात या दरम्यान त्याचे रूपांतर LDL मध्ये होते .
  • LDL - हे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराईड्स, अपॉलिपोप्रोटीन आणि फॉस्फोलिपिड मिळून बनलेले असते . याचे काय काम असते?
  1. पेशी आवरण तयार करते
  2. विविध हार्मोन्स तयार करणे
  3. व्हिटॅमिन D तयार करणे
  4. जिथे जखम झाली असेल तिथे रिपेयर करणे ( हेच कोलेस्टेरॉलचे मदत करणे पुढे ब्लॉकेजेस निर्माण करते , जेंव्हा रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तराला सूज येते जखम होते तेंच ती जखम बरी करायला हे LDL धावत जाते .याला बिचार्याला म्हणूनच वाईट कोलेस्टेरॉल असे म्हटले जाते . पण जर रक्तवाहिनीला जखम झालीच नसेल तर ???? ते जाईल का ? साचेल का ? विचार करा )
  • HDL - हे यकृत आणि छोट्या आतड्यात तयार होते . याचे प्रमुख काम जिथे जिथे पेशी आणि उतींमध्ये जास्तीचे कोलेस्टेरॉल साचले असेल ते काढून पुन्हा यकृतामध्ये नेऊन टाकण्याचे काम होते म्हणूनच याला चांगले कोलेस्टेरॉल म्हणतात .


आणि म्हणून HDL ला चांगले तर LDL ला वाईट कोलेस्टेरॉल म्हटले गेले .आणि ट्रायग्लिसेराईड्स हे पण वाईटच समजले जातात . पण या समजुतीला चॅलेंन्ज देणाऱ्या एका घटनेने अजून खोलवर संशोधन होत गेले .


 Limone Sul Garda नावाचे उत्तर इटलीमधील एक गाव आहे. 1974 मध्ये तिथल्या एका व्यक्तीच्या रिपोर्ट मध्ये खूप जास्त ट्रायग्लिसराईड्स सापडले आणि चांगले कोलेस्टेरॉल एकदम कमी सापडले . अशा या व्यक्तीला हृदयरोगाचा कोणताही त्रास नव्हता म्हणून मिलान युनिव्हर्सिटी मध्ये संशोधन केले गेले .तेंव्हा असे लक्षात आले त्याच्या कोलेस्टेरॉल मध्ये Apo A -1 नावाचा वेगळा व्हेरियंट आहे जो कमी HDL असून उत्तम काम करतो . त्यामुळे हृदयाला प्रोटेक्शन मिळते .


जास्त कोलेस्टेरॉल =जास्त ब्लॉकेजेस

हे समीकरण नसून त्यात खालील गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतात . ब्लॉकेजेस तयार होण्यासाठी खालील गोष्टी एकत्र याव्या लागतात .


High Cholesterol + Inflammation + Endothelial damage + Oxidative stress


यापैकी सगळे घटक बिघडलेले आणि वाढलेले असतील तर ब्लॉकेजेस होण्याची शक्यता जास्त .एक एक घटक कमी होत गेला कि ब्लॉकेजेस होण्याची शक्यता कमी. किंबहुना या चार घटकांवर आपण ट्रीटमेंट करत गेलो कि ब्लॉकेजेस कमी पण होऊ शकतात , निदान ते स्थिर / स्टेबल होतात .


HIGH CHOLESTEROL

LDL हे जास्त असणे धोकादायक असते पण खरे तर जे LDL चे पार्टीकल ( कण ) मोठे फ्लफी असतात ते रक्तवाहिनीमध्ये ( आतल्या अस्तरामध्ये ) घुसू शकत नाहीत , पण जे dense / छोटे असतात ते आत जाऊ शकतात . मग हे छोटे आणि मोठे LDL असे मोजणारी काही टेस्ट आहे काय ??

होय

NMR LipoProfile

या टेस्ट मधून आपल्याला कोणते LDL किती आहेत हे बारकाईने कळते

  1.  LDL-P (Particle Number)
  2. Small LDL-P
  3. LDL Size
  4. LDL Pattern
  5. LP-IR Score

एवढ्या गोष्टी या रिपोर्ट मधून कळतात . . म्हणजे नेहेमीच्या रिपोर्ट मध्ये टोटल कोलेस्टेरॉल जास्त असेल पण या रिपोर्ट मध्ये पॅटर्न A चे किंवा मोठ्या साईझ चे LDL जास्त असतील तर टोटल कोलेस्टेरॉल जास्त असूनही धोकादायक नाही .


चांगले कोलेस्टेरॉल HDL हे 40 ते 50 च्या वर हवे . कारण ते रक्तवाहिनीच्या अस्तरात घुसलेले वाईट कोलेस्टेरॉल काढून यकृतात नेऊन टाकते . पण वर आपण इटलीतल्या गावामध्ये सापडलेली केस पहिली. त्या नंतरच्या संशोधनातून असे लक्षात आले कि TOTAL HDL पेक्षा HDL चे पार्टीकल किती हे जास्त महत्वाचे आहेत . आपल्याला वर सांगितलेल्या NMR LipoProfile रिपोर्ट मधून कळते HDL-P (total). याही लहान आणि मोठे असे आकार असतात . LDL च्या उलट यात लहान आकाराचे HDL जास्त असणे म्हणजे चांगले . मोठे कण हे अकार्यक्षम असतात .

त्यातही अजून बारकाईने बघायचे झाल्यास

Cholesterol Efflux Capacity (CEC)- रक्तवाहिनीतून किती परिणामकारक रित्या वाईट कोलेस्टेरॉल खेचून काढून यकृतात नेऊन सोडते हे सांगणारी टेस्ट आहे.

Apolipoprotein A-1 (ApoA-1) - हे जास्त असेल तर HDL जास्त परिणामकारक काम करते . हि टेस्ट हल्ली केली जाते .


परंतु या सर्व टेस्ट्स नेहेमी केल्या जाणाऱ्या लिपिड प्रोफाइल पेक्षा बऱ्याच महाग असतात . नेहेमीची लिपिड प्रोफ़ाइल  टेस्ट हि 350 पासून 750 रु पर्यंत होते तर NMR लिपिड प्रोफाइलया टेस्ट ची किंमत 2500 पासून पुढे असते . शिवाय ती सहसा कुणी करत नाही. ती फक्त संशोधना साठी केली जाते.मग काय करायचे ?


तुमच्या कणांचा आकार (particle size) जाणून घेण्यासाठी तुम्हाला नेहमीच विशेष NMR लिपिड प्रोफाइल चाचणीची गरज नसते.TG/HDL गुणोत्तर (ratio) हा बघणे खूप गरजेचे असते .

TG /HDL - हा तिच्या जितका खाली तितकी ब्लॉकेजेस ची शक्यता कमी , जितका जास्त तितकी ब्लोकेजेसची शक्यता जास्त . 3 च्या वर असणे धोकादायक .

  • जर तुमचे TG/HDL गुणोत्तर (ratio) खूप कमी असेल (उदा. १.० किंवा १.५), तर तुमचे LDL कण मोठे आणि हलके (large and buoyant) असण्याची दाट शक्यता असते; मग तुमचा एकूण LDL (LDL count) थोडा जास्त असला तरीही ते फारसे धोकादायक नसते.
  • TG/HDL गुणोत्तर (ratio) केवळ LDL च्या आकाराबद्दलच नाही, तर  HDL च्या गुणवत्तेबद्दल (Quality) आणि कार्यक्षमतेबद्दल देखील महत्त्वाची माहिती देते. कमी गुणोत्तर (उदा. १.५ पेक्षा कमी) म्हणजे तुमचे HDL कण केवळ संख्येने जास्त नाहीत, तर ते कार्यक्षम आहेत. ते रक्तवाहिन्यांमधील जास्तीचे कोलेस्ट्रॉल काढून टाकून यकृताकडे (liver) नेण्याचे काम उत्तम प्रकारे करतात.
  • जास्त Ratio: म्हणजे तुमचे HDL कण लहान आणि कमकुवत आहेत, ज्यामुळे ते हृदयाचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरतात.


INFLAMMATION

ब्लॉकेजेस होताना कोलेस्टेरॉल रक्तवाहिनीच्या आत का जाते तर रक्तवाहिनीला आत सूज Inflammation असेल तरच , तर मग बघूया हि सूज कशाने येते ?

  1. स्मोकिंग
  2. इन्सुलिन रेसिस्टन्स -इन्सुलिन हे रक्तामध्ये आलेल्या साखरेला स्नायूंमध्ये , पेशींमध्ये व चरबीमध्ये घेऊन जाण्याचे काम करते आणि त्यामुळे खाल्ल्यानंतर रक्तातली साखर नॉर्मल राहाते . पण या इन्सुलिन ला काम करायला पेशीतून विरोध होतो तेंव्हा त्याला इन्सुलिन रेसिस्टन्स असे म्हणतात . पेशींमध्ये इन्सुलिन साखर घेऊन गेले नाही तर काय होईल ?? रक्तातली साखर नेहेमीपेक्षा जास्त असेल. इन्सुलिन पण नेहेमीपेक्षा जास्त दिसेल . मग उपाशीपोटीचे इन्सुलिन आणि उपाशीपोटीची साखर दोन्ही जास्त असेल तर इन्सुलिन रेसिस्टन्स आलेला आहे असे समजावे . यातूनच पुढे टाईप 2 या प्रकारचा मधुमेह होतो. पण हीच प्रक्रिया रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण करते.हा इन्सुलिन रेसिस्टन्स मोजता येतो .
  3. दीर्घकालीन ताण
  4. व्हिंसेंरल फॅट - म्हणजे पोटातल्या अवयवांभोवतीचे फॅट . हे वरून तर काही दिसत नाही वरून बारीक असणाऱ्या माणसाला पण हे फॅट असू शकते . व्हिंसेंरल फॅट असण्याचे काही निर्देशक म्हणजे पोटाचा घेर होय . पुरुषांमध्ये 102 सेमी आणि स्त्रियांमध्ये 88 सेमी पेक्षा कमी असायला हवा . किंवा कंबर / नितंब हा भागाकार पुरुषांमधे 0.90 तर स्त्रीयांमध्ये .85 पेक्षा कमी असायला हवा
  5. ऑटोइम्युनीटी ऍक्टिव्हिटी -आपल्याच शरीरातील रोगप्रतिकारक पेशी बाहेरच्या जिवाणूचा हल्ला समजून शरीरातील पेशींविरुद्ध युद्ध पुकारतात / हल्ला करतात त्याला ऑटोईम्म्युनीटी म्हणतात. NA (Antinuclear Antibody) हि टेस्ट त्यासाठी आहे .


या सर्व कारणांनी रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तराला सूज येते .

शरीरामध्ये सूज येत आहे हे तपासता येते का ? याना INFLAMMATORY MARKERS असे म्हणतात .

High-Sensitivity C-Reactive Protein (hs-CRP)

शरीरात कुठेही सूज असेल तर याची लेव्हल वाढलेली असते

  • Low Risk: < 1.0 mg/L
  • Average Risk: 1.0 to 3.0 mg/L
  • High Risk: > 3.0 mg/L

Lp-PLA2 (PLAC टेस्ट): हे एक विशिष्ट एन्झाइम (enzyme) आहे जे रक्तवाहिन्यांमधील सूज किंवा दाह (inflammation) दर्शवते. जर या एंझाइमची पातळी वाढली असेल, तर रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला प्लाक फुटून हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते. हि चाचणी hs -CRP पेक्षा जास्त महत्वाची आहे कारण hscrp शरीरात कुठेही सूज सेल तरी वाढते , मर Lp-PLA2 हे फॅट रक्तवाहिन्यांची सूज दर्शविते . ब्लॉकेजेस आहेत परंतु फारशी लक्षणे नाहीत तर ब्लॉकेजेस कडे किती गांभीर्याने बघायचे हॆ ही टेस्ट सांगू शकते.

एन्डोथेलियम

हृदयाच्या रक्तवाहिनीचे स्वास्थ्य कशामुळे टिकेल ? रक्तवाहिनीच्या आतल्या बाजूला एक पेशींचा पातळ ठार असतो याला एन्डोथेलियम असे म्हणतात . याचे काम काय ?

  • रक्तदाब नियंत्रित करणे
  • रक्ताची गुठळी बनू न देणे
  • सूज येऊ न देणे
  • रक्तवाहिन्या गरजेनुसार आकुंचित विस्फारित करणे

हि सर्व कामे हे अस्तर NO म्हणजे नायट्रिक ऑक्साईड च्या माध्यमातुन करत असतो .हा NO कमी झाला तर त्याला एन्डोथेलियम डिसफंक्शन असे म्हणतात . हे एन्डोथेलियम डिसफंक्शन उच्चरक्तदाब , मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स , ब्लॉकेजेस स्ट्रोक या सर्वाना कारणीभूत असते.

NO कशामुळे कमी होतो ?

  • स्मोकिंग
  • मधुमेह
  • ओबेसिटी
  • दीर्घकालीन ताण
  • बैठी जीवनशैली


ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (Oxidative Stress)

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (Oxidative Stress) म्हणजे शरीरातील मुक्त रॅडिकल्स (Free Radicals) आणि अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) यांच्यातील बिघडलेले संतुलन होय.

सोप्या भाषेत सांगायचे तर, ही तुमच्या शरीराच्या पेशींना गंज लागण्यासारखी प्रक्रिया आहे.

म्हणजे नेमके काय?

१. फ्री रॅडिकल्स (Free Radicals): हे असे रेणू आहेत ज्यात ऑक्सिजन असतो आणि ते अत्यंत अस्थिर असतात. शरीरात ऊर्जा तयार होताना हे नैसर्गिकरित्या तयार होतात. पण त्यांची संख्या वाढली की ते निरोगी पेशींना इजा पोहोचवू लागतात.
२. अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants): हे रॅडिकल्सना शांत करण्याचे किंवा निष्प्रभ करण्याचे काम करतात.

जेव्हा शरीरात फ्री रॅडिकल्स जास्त होतात आणि त्यांना रोखण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स कमी पडतात, तेव्हा 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस' निर्माण होतो.

याची प्रमुख कारणे:

  • प्रदूषण: हवेतील प्रदूषण आणि विषारी रसायने.
  • जीवनशैली: धूम्रपान, मद्यपान आणि जंक फूडचे अतिसेवन.
  • मानसिक ताण: सततचा ताण आणि अपुरी झोप.
  • बाहेरचे घटक: अतिनील किरण (UV rays) आणि रेडिएशन.

शरीरावर होणारे परिणाम:

दीर्घकाळ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस राहिल्यास खालील समस्या उद्भवू शकतात:

  • वृद्धत्व: त्वचेवर सुरकुत्या पडणे आणि लवकर म्हातारपण येणे.
  • हृदयविकार: रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे
  • इतर आजार: मधुमेह, कर्करोग आणि विसरभोळेपणा (Alzheimer's).


ब्लॉकेजेस होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या 4 घटकांची माहिती आपण घेतली . हे चार घटक नियंत्रित कसे करता येतील ते पाहू

  • शाकाहारी पदार्थांमध्ये कोलेस्टेरॉल नसते . परंतु अंडी मांसाहार आणि प्राणिज फॅट या मध्ये कोलेस्टेरॉल असते . परंतु मजेची गोष्ट अशी कि 70 - 80 % कोलेस्टेरॉल हे शरीर स्वतःच यकृतामध्ये बनवत असते . म्हणजे जरी तुम्ही आहारातले कोलेस्टेरॉल शून्य केले तरी शरीर बनवतच राहणार कारण कोलेस्टेरॉल हि शरीरासाठी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे .तुम्ही आहारातून जास्त घेतले तर शरीर कमी बनवणार तुम्ही आहारातून कमी घेतले तर शरीर जास्त बनवणार .
  • आधुनिक वैद्यकामधे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी स्टॅटिन्स नावाची औषधे वापरतात . ती यकृतातले त्याचे उत्पादन कमी करतात काही औषधे आतड्यातून त्याचे शोषण कमी करतात .
  • आयुर्वदातील काही वनस्पती आहेत अर्जुन त्रिफळा हळद लसूण ओवा जी कॊलेस्टेरॊल काही  प्रमाणात कमी करतात. आधुनिक वैद्यकाच्या संशोधन प्रमाणानुसार या वनस्पतींचे संशोधन होऊ शकत नाही कारण हि औषधे एक्सट्रॅक्ट स्वरूपात वापरली जात नाहीत त्यामुळे ती तेवढ्या तीव्रतेने काम करत नाहीत , एखाद्या वनस्पती चूर्णाचे स्टॅण्डर्डायझेशन हो थोडी अवघड गोष्ट आहे.

आर्युर्वेदात जी औषधे फॅट वर वापरली जातात ती कोलेस्टेरॉल वर काम करतीलच .

दुसरे असे कि कोलेस्टेरॉल वाढले तर नक्की वाईट कोलेस्ट्रॉल चे लहान कण वाढले असतील तर चिंता करावी.ट्रायग्लिसेराईड्स आणि HDL याचा रेशो म्हणजे गुणोत्तर तपासावे 

चांगले कोलेस्टेरॉल चांगल्या मात्रेत असेल तर चिंता करू नये .

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही वनस्पती मिळून बनवलेले WINCOL नावाचे चूर्ण माधवबागेत मिळते. स्टॅटिन एवढे तीव्र नाही तरी काही प्रमाणात कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम करते , शिवाय याने पचनप्रक्रिया पण सुधारते.


आयुर्वेदातले स्नेहन स्वेदन एन्डोथेलियम चे काम सुधारायला मदत करतात .कसे ?

स्नेहन म्हणजे मसाज

  • स्थानिक रक्तप्रवाह वाढतो आणि नायट्रिक ऑक्साईड (NO ) रिलीज होतो .
  • flow mediated dilatation होते .
  • मसाज मुळे शरीरात सूज निर्मिती करणारे cytokines आणि cortisol हिंडत असतात ते कमी होतात त्यामुळे एन्डोथेलियम सुरक्षित राहते .
  • lymphatic drainage मुळे पेशींमधली सूज कमी होते oxidative stress कमी होतो

स्वेदन शरीरावर काय परिणाम करते

  • रक्तवाहिन्या विस्फारतात
  • रकवाहिन्यांचा कडक पणा नियमित स्नेहन स्वेदनाने कमी होऊ शकतो
  • नायट्रिक ऑक्साईड ची bioavailability वाढते .

हे परिणाम नियमित स्नेहन स्वेदन घेतले तर टिकतात.


आयुर्वेदातील एन्डोथेलियम वर काम करणारी द्रव्ये

आवळा, अश्वगंधा, हरितकी ,अर्जुन हि द्रव्ये endothelium चे काम सुधारतात असे संशोधन आहे . पण हि चारही द्रव्ये आयुर्वेदात वेगवेगळ्या परिस्थितीत वापरली जातात . तुम्हाला लक्षणे असल्यास सल्ला घेऊनच वापरावी .

त्यातही आयुर्वेदाने एक नित्य सेवनीय गट सांगितला आहे , म्हणजे रोज घेतले तरी दुष्परिणाम नाही असा द्रव्यांचा गट . त्यात आवळा आहे . आवळा रोज घेणे हे कोणत्याही आजारासाठी निर्धोक आहे. आवळा + हळद याला निशाआमलकी योग्य म्हणतात. त्याचा स्वतंत्र ब्लॉग लिहिलेला आहे तो वाचावा .एन्डोथेलियल डिसफंक्शन प्रामुख्याने असणारा आजार म्हणजे ब्लॉकेजेस ,हृदयरोग . म्हणूनच माधवबागेचे माधवप्राश ज्यात आवळा हा प्रमुख घटक आहे ते प्रत्येकाला दिले जाते .


सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्सुलिन रेसिस्टन्स या घटकावर काम करणारी आयुर्वेदामध्ये असंख्य द्रव्ये आहे. यावर रिसर्च हि झालेला आहे. हळद , अर्जुन , हरितकी , अश्वगंधा , गुडूची ( गुळवेल ) अशी अनेक . मात्र हि औषधे कशी घ्यायची किती मात्रेत घ्यावी यासही वैद्यांचा सल्ला घ्यावा . याशिवाय आहार हाही खूप महत्वाचा भाग आहे. त्याचाही सल्ला घ्यावा

प्रत्यक्ष लक्षणे आजार आणि रिपोर्ट बारकाईने पाहूनच कोणते द्रव्य याचा निर्णय घेला जातो .


वरील सर्व माहिती वाचून कदाचित नक्की काय तपासण्या कराव्या असा प्रश्न पडला असेल तर खालील मुद्दे फक्त लक्षात ठेवावे .

कोलेस्टेरॉल वाढले असेल तर हार्ट अटॅक आल्यासारखे घाबरून जाऊ नये . लगेचच कोलेस्टेरॉल चे उत्पादन थांबवणारी औषधेही चालू करू नये . आपले लिपिड नक्की धोकादायक आहे का हे आधी तपासून पाहावे . नेहेमीच्या लिपिड प्रोफाइल मधला TG आणि HDL याचा रेशो म्हणजे भागाकार पाहावा . तो 3 च्या खाली आहे ना हे पाहावे . 3 च्या खाली असेल तर तर काळजी करू नये पण जीवनशैली ,  आहार तपासून पाहून बदल करावा .

हा रेशो 3 च्या वर असेल तर स्ट्रेस टेस्ट + 2 D ECHO या तपासण्या करून घ्याव्या आणि डॉ चा सल्ला घ्यावा .

जीवनशैली मध्ये कोणता बदल काणे अपेक्षित आहे ?


  • दोन्ही रिपोर्ट बिघडलेले असतील तर मांसाहार अंडी 3 महिन्यांसाठी बंद करावे
  • तळलेले गोड बेकरीचे मैद्याचे पदार्थ बंद करावे .
  • तेलाचा वापर माफक , साजूक लोणकढं तूप चालेल .( तूप का चालेल या साठी  आपल्या भारतीय पद्धतीने बनवलेल्या तुपावर लिहिलेला ब्लॉग वाचावा )
  • भूक असेल त्याप्रमाणेच 2 किंवा 3 वेळा खावे . भूक नसताना जबरदस्ती वेळ झाली म्हणून गोळ्या घ्यायच्या म्हणून खाऊ नये .
  • वजन जास्त असेल तर 800 कॅलोरी चा आहार चालू करावा .
  • मधुमेह असेल तर तो नियंत्रित आहे कि नाही ते पाहावे .
  • स्मोकिंग तंबाखू ताबडतोब बंद करावे .
  • मानसिक ताण कमी करण्यासाठी ओंकार प्राणायाम दीर्घ श्वसन चालू करावे .
  • चालणे / सूर्यनमस्कार / जिम / पोहोणे यापैकी काहीही वयानुसार व्यायाम करावा .


तुमच्याकडे सर्व रिपोर्ट आहेत पण काय करावे हा गोंधळ आहे तर सल्ल्यासाठी जरूर भेटा.

नाशिक सेंट्रल माधवबाग

9226958538 .

नाशिक रोड माधवबाग

9226971478










शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

अँजिओप्लास्टीचा ब्लॉकेजेसवर होणारा परिणाम

 


  • अँजिओप्लास्टी म्हणजे काय ? वैद्यकीय भाषेत याला ptca ( percutaneous transluminal coronary angioplasty) म्हणतात.


अँजिओप्लास्टी मध्ये ब्लॉकेजेस काढले जातात का ?

नाही . मग नक्की काय केले जाते ??


  • हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत ब्लॉकेजेस पर्यंत एक गाईड वायर जाते . ब्लॉकेजेस पाशी एक फुगा फुगवला जातो त्यामुळे ब्लॉकेजेस दाबले जातात , त्यावरचे आवरण ब्रेक होते आणि रक्तवाहिनी किंचित विस्फारली जाते .आतले अस्तर किंचित फाटते. रक्तवाहिनी लवचिक असते फुगा काढून टाकल्यावर ती परत मूळ पदाला येऊन आकुंचन पावते, तसे होऊ नये म्हणून त्यानंतर स्टेण्ट बसवले जातो ,त्यामुळे विस्फारलेली रक्तवाहिनी विस्फारलेलीच राहते . आता हि एक प्रकारची कंट्रोल्ड इंज्युरी झालेली असते रक्तवाहिनीला , त्यातून रक्ताची गुठळी बनू शकते जी हार्ट अटॅक आणू शकते म्हणून प्लास्टी नंतर पुढे 3 ते 6 महिने पोटातून रक्त पातळ करणारी औषधे घ्यावी लागतात . या रक्तवाहिनीला स्टेंट मुळे झालेली बारीकशी जखम भरताना तिथे पुन्हा ब्लॉकेजेस तयार होऊ नये म्हणून त्या स्टेण्टवर औषधे बसवलेली असतात . ( DES -drug eluded stent ) .


या सर्व प्रोसिजर मध्ये ज्या ब्लॉकेजेस वर आपण ट्रीटमेंट केली त्या ब्लॉकेजेस चे काय झाले ? निघाले का ते ??


  • ते ब्लॉकेजेस दाबले गेले थोडे ब्रेक पण झाले आणि आतल्या अस्तरात ढकलले गेले .
  • lipid core may remain - म्हणजे ब्लॉकेजेस चा गाभा जो लिपिड म्हणजे मेद ( कोलेस्टेरॉल ) साचून बनलेला असतो तो तसाच राहू शकतो .


अँजिओप्लास्टी चा दीर्घकालीन परिणाम

  • रक्त वाहिन्यातील ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया तशीच चालू राहाते .
  • इतर ठिकाणी ब्लॉकेजेस होऊ शकतात .
  • स्टेण्ट च्या ठिकाणी पण नवीन ब्लॉकेजेस होण्याची शक्यता असते .


  • यात ब्लॉकेजेस असलेला रुग्ण जर मधुमेही असेल तर रक्तवाहिनीच्या आतून आधीच सूज जास्त असते , प्लास्टी नंतर झालेली बारीकशी जखम भरण्याची प्रोसेस अचानक भरभर होऊ शकते. मधुमेही लोकांमध्ये ब्लॉकेजेस ची लांबी जास्त असते अशावेळेस स्टेण्ट ने पूर्ण लांबीचे ब्लॉकेजेस कव्हर होत नाहीत .मधुमेही रुग्णाची साखर सतत वर खाली होत असेल तर प्लास्टी नंतर पण ब्लॉकेजेस अस्थिर राहू शकतात . तसेच बारीक रक्तवाहिन्यांचे जास्त नुकसान झालेले असते . त्यामुळे मधुमेही रूग्णांना अँजिओप्लास्टी चा नक्की काय फायदा होतो हा प्रश्न आहेच .


या अन्जिओप्लास्टीने हृदयरोगाला नक्की काही फरक पडतो का ? फरक पडत असेल तर किती वर्षे पडतो ??


आपण समजा ब्लॉकेजेस असलेले काही पेशंट घेतले ज्यांना स्टेबल म्हणजे हार्ट अटॅक आलेला नाहीये असे पेशंट , यात काही पेशंटची अँजिओप्लास्टी केली काहींना नुसते औषधावर ठेवले तर दोन्ही ग्रुपमध्ये तुलना केली तर काय सापडेल ??


बघूया काही प्रसिद्ध संशोधन


COURAGE ट्रायल 2007 निष्कर्ष थोडक्यात

2287 स्टेबल ब्लॉकेजेस असलेले रुग्ण समाविष्ट

ग्रुप 1 - PCI ( अँजिओप्लास्टी ) + औषधे

ग्रुप 2- फक्त औषधे आणि जीवनशैली बदल

मुख्य निष्कर्ष :

1.मृत्यू - दोन्ही गटात फरक नाही

2.हार्ट अटॅक (MI) - महत्वपूर्ण फरक नाही

3.छातीत दुखणे (angina) - प्लास्टी नंतर सुरुवातीला जास्त बरे वाटले

4. 15 वर्षांनंतरहि मृत्य व हार्ट अटॅक मध्ये वरील प्रमाणेच निष्कर्ष


BARI 2D ट्रायल 2008

( Bypass Angioplasty Revascularization Investigation 2 Diabetes )

कालावधी -5.3 वर्षे

type 2 मधुमेह आणि स्थिर ब्लॉकेजेस असणारे 2368 रुग्ण समाविष्ट

ग्रुप 1- प्लास्टी किंवा बायपास + औषधे

ग्रुप 2- फक्त औषधे

मुख्य निष्कर्ष -

  1. एकूण मृत्यदंर - दोन्ही गटात फरक नाही
  2. एकूण हार्ट अटॅक (MI )- दोन्ही गटात फरक नाही .
  3. काही रुग्णांना अनेक रक्तवाहिन्यांत ब्लॉकेजेस होते त्यांची बायपास केली त्यांना तुलनेत कमी हार्ट अटॅक ( non fetal MI ) आले औषधी ग्रुप पेक्षा . किती कमी ? तर औषधी घेत असलेल्या रुग्णांपैकी 17.6 % लोकांना गंभीर नसलेले हार्ट अटॅक अले तर बायपास झालेल्या रुग्णांपैकी 10 % लोकांना गंभीर नसलेले हार्ट अटॅक आले .( मात्र मृत्यदरात फरक नव्हता )



FAME 2 ट्रायल

Fractional flow reserve - guided PCI vs medical therapy

FFR हि टेस्ट म्हणजे काय आपण मागच्या लेखात पहिले आहे.

ग्रुप 1- FFR टेस्ट नंतर जे ब्लॉकेजेस रक्तपुरवठा अडवत आहेत अशा ब्लॉकेजेस वरच प्लास्टी केली असे 447 रुग्ण होते .

ग्रुप 2- रक्तपुरवठा अडवणाऱ्या ब्लॉकेजेस चे रुग्ण फक्त औषधे घेत होते अ से 441 रुग्ण घेतले .


प्रमुख निष्कर्ष

पहिल्या 2 वर्षात

  1. हार्ट अटॅक - पहिला ग्रुप - 8% दुसरा ग्रुप - 12 %

पुढच्या 5 वर्षात

  1. हार्ट अटॅक - पहिला ग्रुप 8 % दुसरा ग्रुप - 13%

लक्षणांमुळे किंवा ecg बदलामुळे तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करून प्लास्टी करण्याची गरज पडली असे -

पहिल्या 2 वर्षात - पहिला ग्रुप - 4 % दुसरा ग्रुप - 16.3 %

5 वर्षात - पहिला ग्रुप -6-7 % दुसरा ग्रुप 21-22 %

पूर्ण 5 वर्षात दोन्ही ग्रुपच्या मृत्यदारमध्ये फरक नव्हता .


ISCHEMIA ट्रायल (2020)

Inernational Study of Comparitive Health Effectiveness with Medical and Invasive Approaches

स्थिर ब्लॉकेजेस आणि हृदयाला मध्यम ते गंभीर रक्तपुरवठा कमी असणारे (ischemia ) रुग्ण -5179

ग्रुप 1- Invasive ग्रुप यात नुसती अँजिओग्राफी झालेले 345 , प्लास्टी झालेले 1852 तर बायपास झालेले 391 जण होते

ग्रुप 2- स्थिर ब्लॉकेजेस आणि ischemia असलेले 2591 जण ज्यांनी फक्त औषधोपचार केले


मुख्य निष्कर्ष

  1. मृत्यू / हार्ट अटॅक /तातडीने ऍडमिट /हार्ट फेल्युअर - दोन्ही ग्रुप मध्ये फरक नाही
  2. छातीत दुखणे - ग्रुप 1 मध्ये थोडेसे कमी झाले .


या सर्व संशोधनांच्या निष्कर्षांमधून काय जाणवते ?? स्टेबल ब्लॉकेजेस च्या रुग्णांना प्लास्टी करून कोणाही अतिरिक्त फायदा होत नाही औषधाने जेवढा फायदा होतो तेवढाच .


आता अजून एक संशोधन पाहू

Exercise-based cardiac rehabilitation (CR) for coronary artery disease (CAD)

हा एक cochrane database systemic review आहे. यात एकूण 85 ट्रायल्स ( 23430 सहभागी हार्ट रुग्ण ) मधून काढलेला निष्कर्ष आहे . याचे थोडक्यात महत्वाचे निष्कर्ष असे -

स्टेबल ब्लॉकेजेस च्या रुग्णांनी व्यायामावर आधारित जीवनशैली बदलली तर काय फरक पडतो ?

कोणत्याही कारणाने हॉस्पिटल मध्ये भरतीचे प्रमाण - 42% ने कमी झाले .

हार्ट अटॅक चे प्रमाण - 28 % ने कमी झाले .

मृत्यूचे प्रमाण - 13 % ने कमी झाले .


तुमची अँजिओग्राफी झाली आहे का ?? मग खालील गोष्टी लक्षात ठेवा


  • ब्लॉकेजेस किती आहेत या पेक्षा ते रक्तपुरवठा अडवता आहेत का हे पाहाणे गरजेचे आहे .
  • ब्लॉकेजेस रक्तपुरवठा अडवता आहेत कि नाही यासाठी FFR ही तपासणी किंवा अधिक ऍडव्हान्स तपासण्या करणे शक्य नसेल तर स्ट्रेस टेस्ट आणि 2 डी इको कार्डियोग्राफी तरी नक्की करून घ्यावी
  • तातडीचा कोणाही त्रास नसेल तर कितीही ब्लॉकेजेस असतील तरी जीवनशैली बदलणे आणि गरजेनुसार औषधे घेणे हाच सर्वप्रथम योग्य मार्ग आहे.

ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी किंवा ते अस्थिर असतील तर स्थिर ( स्टेबल ) करण्यासाठी ते कसे झाले हे बघणे महत्वाचे असते , जे आपण आधीच्या लेखात बघितले . आता पुढच्या लेखापासून ब्लॉकेजेस निर्माण होण्यास करणीभून असणारे सर्व घटक विस्ताराने बघणार आहोत. नुसते बघणार नाही तर त्यावर उपचारही बघणार आहोत .

तुमची अँजिओग्राफी झाली असेल आणि तुम्हाला काही शंका असतील / तुमच्या रिपोर्ट बद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे असेल तर खालील क्रमांकावर संपर्क करा . या नंबरवर तुम्ही तुमचे रिपोर्टही पाठवू शकता .


नाशिक पंडित कॉलनी नाशिक रोड माधवबाग

9226958538

9226403518


ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...