डॉक्टर रोहित साने .
काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ," डॉक्टर मला ब्लॉकेजेस सांगितले आहेत . सगळेजण लगेच अँजिओप्लास्टि कर म्हणत आहेत . मला ऑपरेशन ची खूप भीती वाटते.
आजवर माझ्याकडे आलेल्या अनेक रुग्णांमध्ये मी हीच भावना पुनः पुन्हा पहिली आहे.
आपल्याला हृदयविकार आहे किंवा अँजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस आढळले आहेत असे कळताच रुग्ण अक्षरशः हदारतो.
" आपल्याला हार्ट अटॅक येईल का ? , आपण वाचू का ?? या भीतीने तो पूर्ण घाबरून जातो . खरे सांगायचे तर ही त्या एकटयाचीच कथा नाही तर आजवर भेटलेल्या शेकडो रुग्णांची हीच गोष्ट आहे . घरच्यांचा दबाव , समाजाचे बोलणे आणि "लगेच स्टेन्ट टाका " हा सल्ला यामुळे रुग्ण घाईघाईत निर्णय घेतो . पण त्यानंतर सुरू होतो एक वेगळाच प्रवास . औषधे ,सततचा खर्च आणि मनावरचे दडपण . ही सगळे अनुभवताना मला वारंवार एकच प्रश्न पडत राहीला , की खरंच हा अंतिम उपाय आहे का ??, की आपण मूळ कारणाकडे दुर्लक्ष करत आहोत ? प्रत्येक ब्लॉकेज म्हणजे स्टेन्ट असे नसते . हा निर्णय घाईत घेण्यासारखा नाही समजून घेण्यासारखा आहे .
मी स्वत: या विषयावर खूप अभ्यास केला . अनेक रुग्णांचे अनुभव पहिले . अँजिओप्लास्टि या विषयावर जगभरात झालेल्या मोठ्या संशोधानांचा अभ्यास केला .
The Lancet आणि New England Journal of Medicine या नावांच्या मासिकामध्ये प्रकाशित झालेले दोन संशोधने महत्वाची आहेत .
ORBITA आणि ISCHEMIA - या दोन्ही संशोधनानी एक वेगळाच दृष्टिकोण दिला . खरंतर अँजिओप्लास्टि संबंधित अनेक संशोधने करण्यात आली आहेत . COURAGE trial , BARI 2 D study ... पण आता मी तुम्हाला प्रथम ORBITA संशोधना विषयी समजवतो . या सगळ्या संशोधानांचा एकच उद्देश होता , अँजिओप्लास्टि करून रुग्णांच्या आयुष्यात किती फरक पडतो ही समजून घेणे . तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो की ही संशोधने नेमकी के सांगतात .
ORBITA
हे संशोधन 2017 साली प्रकाशित झाले आणि त्याने जगभरात चर्चा निर्माण केली . या संशोधनात 70 % 80% ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांना दोन गटात विभागले . एक गटाला अँजिओप्लास्टि केली तर दुसऱ्या गटाला फक्त औषधे दिली . विशेष म्हणजे औषधोपचार घेणाऱ्या दुसऱ्या गटाला sham किंवा फेक प्रक्रिया केली गेली ,म्हणजे आपल्यावर ब्लॉकेजेस साठि काहीतरी प्रोसीजर केली गेली आहे असे त्यांना भासवले .
आता तुम्ही विचार कर जर स्टेन्ट टाकणे हा खरेच सर्वोत्तम उपाय असेल तर स्टेन्ट केलेल्या गटात मोठा फरक दिसायला हवा होता . काही आठवडयानंतर जेंव्हा दोन्ही गटांचा अभ्यास केला गेला , तेंव्हा छातीत दुखणे कमी होण्यामध्ये दोन्ही गटांमध्ये जवळजवळ समान परिणाम दिसले . म्हणजेच स्टेन्ट केल्यावरच फक्त आराम मिळतो असे नाही तर योग्य औषधोपचार आणि जीवनशैली बदलली तरी तितकाच फरक पडू शकतो . हा निष्कर्ष खूप महत्वाचा होता . कारण याने आपली विचार करण्याची दिशा बदलली .
यानंतर मी ISHCEMIA संशोधनाचा अभ्यास केला . हे संशोधन आणखी मोठे आणि दीर्घकालीन होते . यात हजारो रुग्णांचा समावेश करण्यात आला . या रुग्णांमध्ये मध्यम ते गंभीर ISHCEMIA होता , म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी पडत होता . एका गटाला फक्त औषध आणि जीवनशैली बदल दिले गेले ., तर दुसऱ्या गटाला अँजिओप्लास्टि किंवा बायपास सोबत औषधे दिली गेली . काही वर्षानी जे निष्कर्ष समोर आले ते अजूनच विचार करायला लावणारे होते .हार्ट अटॅक किंवा मृत्यू टाळण्यात दोन्ही गटात विशेष फरक दिसून आला नाही. म्हणजेच प्रत्येक रुग्णाचे ऑपरेशन केल्यानेच आयुष्य वाचेल किंवा त्रास कमी होईल असे नाही .
इथेच मी माझ्या रुग्णांना एक गोष्ट नेहेमी सांगतो घाबरून निर्णय घेऊ नका . करण रिपोर्ट मध्ये जरी ब्लॉकेजेस दिसत असले तरी शरीराची खरी अवस्था त्यापेक्षा वेगळी असते . मी अनेक वेळा पहिले आहे दोन रुग्णांमध्ये समान ब्लॉकेजेस असतात पण एकाला काही त्रास नसतो , आणि दुसऱ्याला खूप त्रास असतो . मग निर्णय फक्त रिपोर्ट वर कसा घेणार ? इथे आपल्याला समजून घ्यावे लागते हृदयाला खरंच किती रक्त कमी पडतंय ? लक्षणे किती आहेत आणि बाकीची शरीराची स्थिति काय आहे ?/
मी नेहेमी सांगतो हृदयरोगाचा मूळ प्रश्न फक्त ब्लॉकेजेस नसतो तर आपली जीवनशैली हा मूळ प्रश्न असतो . चुकीचा आहार , व्यायामाचा अभाव , सततचा ताण , अपुरी झोप या सगळ्याच गोष्टी हळूहळू हृदयावर परिणाम करत असतात . आणि आपण फक्त ब्लॉकेजेस काढण्यावर लक्ष्य देतो पण या कारणांकडे दुर्लक्ष करतो मग काही महिन्यांनी / वर्षानी तोच प्रश्न समोर येतो .
आता तुम्ही विचाराल मग काय करायच ? मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगतो जर आपण काही गोष्टी बदलल्या तर मोठा फरक पडू शकतो . योग्य आहार म्हणजे तेलकट पदार्थ , जास्त मीठ आणि साखर या गोष्टी कमी करणे . नियमित व्यायाम म्हणजे अगदी साध चालणे सुरू केले तरी चालते . तणावाचे नियोजन , कारण ताण हा हृदयाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. वजन नियंत्रण , पुरेशी झोप या सगळ्या गोष्टी मिळून हृदयाला बळ देतात .
मी अनेक रुग्णांमध्ये असे बदल करून पहिले आहेत खरोखर त्याचा परिणाम दिसतो . हृदयाची कार्यक्षमता सुधारते , ब्लॉकेजेस वाढण्याचा वेग कमी होतो , बरेचदा ऑपरेशन टाळणेही शक्य होते . म्हणूनच मी नेहेमी सांगतो स्टेन्ट टाकणे हा एक पर्याय आहे पण तो एकमेव पर्याय नाही .
हजारो वर्षांपासून आपल्याला लाभलेल्या आयुर्वेदात सांगितलेल्या पंचकर्मावर आधारित विनाशस्त्रक्रिया शरीर आणि हृदय शुद्धीकरण कसे करावे याची माधवबागेने योग्य अशी मांडणी केली आहे . ज्याचा आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक रुग्ण फायदा घेऊन स्वताला हृदयविकाराच्या भीतीपासून पूर्णता: मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहेत. ही विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ब्लॉकेजेस सारख्या गंभीर आजारावर कशी काम करते ही मी तुम्हाला पुढच्या लेखात सविस्तर सांगेन .
शेवटी एकच सांगावेसे वाटते , प्रत्येक रुग्ण वेगळा असतो आणि प्रत्येक निर्णयही वेगळा असायला हवा . घाईत घेतलेला निर्णय आयुष्यभराचा ठरू शकतो पण योग्य माहितीवर , शांतपणे घेतलेला निर्णय आयुष्य वाचवू शकतो . म्हणून तुम्हालाही असा गोंधळ वाटत असेल , तर थांबा , समजून घ्या , आणि मग निर्णय घ्या . कारण कधी कधी संयम हा सगळ्यात मोठा उपचार ठरतो ,
तुम्हालाही ऑपरेशनच्या भीतीपासून दूर राहून निरोगी आयुष्य जगायचे असेल , तर ऑपरेशनचा विचार करण्यापूर्वी एकदा माधवबागेच्या तज्ञ डॉक्टरना नक्की भेटा .
डॉ . रोहीत साने
MD . CEO MADHAVBAUG
नाशिक सेंट्रल माधवबाग
9226403518
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा