सोमवार, २७ मार्च, २०२३

दुध पोषक की विष

 दुध पोषक की विष



 

30 वर्षांपूर्वी कुणी दुध पिणे आरोग्यदायी आहे  का असे विचारले असते तर एकजात सर्वांनी हो  म्हटले असते.

पण आता दुधाबद्दल ईतकी टोकाची मते तयार झाली आहेत की दूध हे पांढरं विष आहे असे म्हटले जाते. जे दूध लहानपणी पूर्णान्न होते ते मोठेपणी एकदम विषच कसे होईल बरे ? 

आयुर्वेद म्हणतो या जगातल्या प्रत्येक पदार्थात  अगदी विषारी पदार्थातही औषधी गुणधर्म असतात. पण योजकस्तत्र दुर्लभः म्हणजे ते युक्तीने वापरणार्यांची कमतरता असते.

मग आता  ही युक्ती काय ती ऐकूया आणि दुध प्यायचे की नाही ते आपण आपलेच ठरवूया.

आपण जे रोज पितो त्या दुधामधे अर्थात गायीचे दुध श्रेष्ठ आहे. गायीचे दुध पोषक आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत ते पोषणाचे काम करत असते. मात्र हे दुध पचायला जड थंड आणि स्निग्ध गुणाचे असते. म्हणून मग ते कोणी घेऊ नये आणि कोणत्या आजारात घेऊ नये हे आधी बघू मग त्याचे फायदे पाहू.

दूध कधी पिऊ नये  ?

▪️ताप आलेला असताना- पहील्या 7 दिवसात पिऊ नये .

 ▪️भूक लागत नाहीये अशी स्थिती असताना .

▪️अपचन होत असेल तर .

▪️शरीरात कुठेही सूज असेल तर

 ▪️त्वचा विकारांमधे 

▪️पोटदुखी जुलाब होणे.

 ▪️खोकला

 या आजारांमधे दूध प्यायचे नाहीये.


 तसेच संतर्पणजन्य विकारांमधे म्हणजे वजन वाढलेले असताना पण दूध पिऊ नये.  डायबेटीस मधे पण दुध आणि दुधाचे पदार्थ टाळायला सांगितले आहे.


कुणी प्यावे

▪️लहान मुले व कृश बारीक व्यक्ती

▪️गर्भिणी व  बाळंतपणात.

 ▪️एखाद्या आजारपणातल्या अशक्तपणात .

▪️ रक्तस्त्राव होणार्या विकारांमधे 


म्हशीचे दूध हे गायीच्या दुधापेक्षा पचायला  जास्त जड असते. जास्त पोषक असते. त्यामुळे वजन वाढवायचे असेल तसेच रात्री झोपेसाठी म्हशीचे दूध प्यावे. अन्यथा गायीचे दूध केंव्हाही ऊत्तमच.


▪️दूध शक्यतो गरम करून साखर न घालता प्यावे. 

▪️दुधासोबत कोणताही पदार्थ शक्यतो खाऊ नये. विशेषतः आंबट खारट पदार्थ दुधासोबत टाळावेतच. त्यामुळे हल्ली स्वैपाक करताना रेसिपीत दूध घालतात ते चुकीचे आहे. 

▪️दूध व मीठ एकत्र घेऊ नये त्यामुळे दूध पाव दूध बिस्कीट खाणे पूर्णपणे चूक आहे. 

▪️कोणतेही फळ दूधात घालून खाऊ नये. एकाच फळाचा अपवाद. आंबा दूधासोबत चालतो.

▪️दुधाचा थंड कफकर गुणधर्म कमी करण्यासाठी सुंठ आले दालचिनी वगैरे दुधातून घेणे चालते.

आयुर्वेदात दुधातून औषधेही सांगितली आहेत त्याला क्षीरपाक असे म्हणतात. अर्जुनसाल , लसूण , लेंडी पिंपळी , शुंठी वगैरे औषधी द्रव्ये दुधात ऊकळून विशिष्ट आजारात देतात. तसेच काही जलोदरासारख्या आजारात फक्त दूधावर राहाण्याचे ऊपायही सांगितले आहेत. 

या विषयी अधिक माहीती हवी असल्यास क्लिनिक ला फोन करून विचारावे


हल्ली A1 A2 दूध वगैरे गोष्टींची फार चर्चा आहे. ती चर्चा ऊगाचच आपल्या मनातला गोंधळ वाढवाते. सोपं काय ? आपण ज्या भागात वर्षानुवर्षे राहातो त्या भागातले पदार्थ आपल्याला सवयीचे असतात. मग आपल्या देशी गायी आणि म्हशी शेळ्या आणि मेंढ्या आपल्याला सवयीच्या . रोजच्या साठी त्यांचे दूध पिणे केंव्हाही ऊत्तमच.

हार्मोन टोचून व्यवसायासाठी जास्त दूध निर्माण केले जाते जे शरीराला हानिकारक असते पण अलीकडे तोही अवेअरनेस वाढलेला आहे दूधाचा व्यवसाय करणार्यांमधे . तेंव्हा हार्मोनविरहीत दूध प्या. 


ऊंट शेळी मेंढी हत्ती यांच्या दुधात औषधी गुणधर्म असतात ते पुढच्या भागात पाहू. तूर्तास गाय म्हैस शेळी मेंढी यांचे दूध असेल आणि तुम्हाला अतिपोषणाचा कोणताही आजार नसेल तर बिनधास्त दूध प्या. दूध पिताना साय बाजूला काढायला विसरू नका. त्या सायीपासून तयार होणारे तूपही तुम्ही बिनधास्त खाऊ शकताय हे आपण मागच्या तूपाच्या मेसेज मधे वाचलेच असेल.

लोणकढं तूपच खाताय ना तुम्ही ?

 तूप



लोणकढं तूपच खाताय ना तुम्ही ?

 

आपल्या भारतीय जेवणामधे पार हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत जेवणासोबत तूप खायची वर्षानुवर्षांची सवय आहे. 

आहे ? ? कदाचित होती म्हणावी लागेल. कारण कोलेस्टेरॉल नावाचा बागूलबोवा आपल्या मानगुटीवर बसवला गेला ज्यामुळे अनेक जणं भातावर,  पोळीवर तूप घेताना दचकू लागले. आलेल्या हार्ट अटॕकला तूपाला जबाबदार धरून बिना तेलतूपाचे खाताना घरी तूप बनवण्याची परंपरा मोडून बाजारातले सोन्याच्या भावातले आॕलीव आॕईल (तेही व्हर्जिन म्हणजे पहील्या धारेचे असेल तर आजूनच महाग ) वापरायला सुरूवात केली. आॕलीव आॕईल वापरणे म्हणजे तुम्ही स्टॕडर्ड ज्ञानी आहात असे समजले जाऊ लागले. 


तर मंडळी खरोखर तूप ईतके वाईट आहे का ? 


मुळात भारतीय तूप यावर काय संशोधन झालय. ?  तूप वाईट आहे हे कॉर्डीयॉलॉजिस्ट जेंव्हा सांगतात तेंव्हा त्यांच्या पुस्तकातले फॕट विषयीचे संशोधन त्यांच्या डोक्यात असते. क्लॕरीफाईड बटर किंवा प्राणिज स्नेह म्हणून तुपाकडे पाहीले जाते.


पण आपण दही विरजून घुसळून लोणी काढून ते कढवून जे तूप बनवतो तसे तूप भारतीय ऊपखंडा व्यतिरिक्त  कुठे बनवले जात असेल का हा संशोधनाचाच विषय आहे.


आता हे घराघरातलं लोणकढं तूप तेही जर गायीचे असेल तर आयुर्वेदाने सगळ्या फॕट्समधे सर्वोत्तम सांगितले आहे. तेलापेक्षाही. 


तूप हे 'संस्कारस्य अनुवर्तनात' म्हणजे ज्या पदार्थासोबत द्याल त्याचे गुणधर्म वाढवते असे आहे , म्हणूनच आयुर्वेदामधे औषधीयुक्त अशा सिद्ध घृताचा वापर केलेला आहे.


नुसते तूप हे निरोगी माणसाने रोज जरूर खावे. भूक लागत नसेल तर जेवताना मधे थोडे तूप आणि सैंधव एकत्र करून खावे.आजारी माणसाने मात्र खावे की न खावे किती खावे हे वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे. कारण सामता असणार्या आजारात तूप नाही असे सांगितले आहे. नी सामता ही वैद्यालाच समजू शकते. 


बर्याचशा कान नाक घश्याच्या रोगांमधे मूळव्याधीमधे स्मरणशक्ती टिकवण्यासाठी म्हणून तूपाची निवळी म्हणजे तूप बनवल्यावर वर जो पातळ भाग राहातो तो , ऊपचार म्हणून सांगितली आहे. 


मात्र हृदयरोग डायबेटीस बिपी वगैरे जीवनशैलीच्या आजारात रोज दोन चमचे गायीचे लोणकढं तूप बिनधास्त खायला हरकत नाही. त्याने कोलेस्टेरॉल वगैरे काही वाढत नाही.


मी तूप खायचे की नाही अशी काहीजणांची शंका असेल तर तुमचा त्रास सांगा ईथेच. डॉक्टर (वैद्य ) स्वतःच येथे मार्गदर्शन करतील . फक्त तूप खावे की नाही हे विचारायला क्लिनिक ला प्रत्यक्ष यायचीही गरज नाही.

9226958538


डाळिंब - हृदयमित्र

 डाळींब - हृदयमित्र



डाळींब आपल्याकडे मुबलक प्रमाणात ऊपलब्ध असते.आयुर्वेदामधे डाळींब हे हृदयासाठी ऊत्तम फळ सांगितले आहे. ( हृद्य ) 

डाळींबावर आतापर्यंत विविध संशोधन झालेले आहे. त्यातूनही हेच सिद्ध केलय 

1. डाळींब हे रक्तवाहीन्यांसाठी प्रोटेक्टीव असे काम करते. म्हणजे ब्लॉकेजेस तयार होण्याच्या सुरूवातीच्या अवस्थेपासूनच काम करते. 

आणि म्हणूनच हृदयरोग्याने रोज डाळींब खावे.

2. डाळींब हे वारंवार लूज मोशन होणे किंवा ईरीटेबल बॉवेल सिंड्रोम यात ऊपयोगी आहे.

3.सूज येणार्या संधीवातातही डाळींब ऊपयोगी पडते. 

4.डाळींबांच्या पानामधे वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे.

असे बरेच गुण डाळींबात आहेत.

मग काय सुरू करा जेंव्हा मिळेल तेंव्हा डाळींब खायला. हां ..मात्र डाळींब हे गोड आणि आंबट अश्या दोन प्रकारात मिळते. हायपरॲसिडीटी होत असेल तर फक्त आंबट डाळींबखाऊनये.

अन्यथा ताप ,खोकला ,सर्दी, असेल  पोट बिघडले असेल , अपचन असेल , सांधेदुखी असेल हृदयरोग असेल ,बिपी ,डायबेटीस असेल ...सर्वांनी डाळींब खा.

सोलून खा ,रस काढून खा. मात्र रस काढताना साखर मीठ घालू नका. 

ऊपाशी पोटी खा जेवणानंतर खा.

डाळींब खा आरोग्यपूर्ण राहा . 



ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...