मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

अँजिओग्राफी आणि ब्लॉकेजेस

 





मागच्या लेखात आपण ब्लॉकेजेस कसे होतात हे पाहिले . सध्या ब्लॉकेजेस साठी आपल्या सर्वाना अँजिओग्राफी हि टेस्ट चांगलीच माहित आहे. अँजिओग्राफी म्हणजे काय ? तर पायाच्या किंवा हाताच्या (radial or femoral artery )रक्तवाहिनीतून बारीक नळी हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत नेऊन एक डाय सोडला जातो जो हृदयाच्या सर्व रक्तवाहिन्यांपर्यंत जातो त्यावेळेस वेगवेगळ्या कोनातून X RAY घेतले जातात , मात्र या इमेजेस 2 डायमेन्शनल असतात.


अँजिओग्राफी विषयी सहसा माहित नसलेली माहिती

  • अँजिओग्राफी हि निरीक्षकावर अवलंबून असलेली गोष्ट आहे ( observer -dependent ). म्हणजे अँजिओग्राफी चा रिझल्ट किती टक्के ब्लॉकेजेस आहेत हे तज्ज्ञ डॉक्टर त्या इमेजेस नजरेखालून घालून स्वतःच्या अनुभवाने टक्केवारी सांगत असतो. त्यामुळे दोन तज्ज्ञ व्यक्तीमध्ये निर्णय देताना टक्केवारीत फरक पडू शकतो ( inter -observer variations ). एकाच रुग्णाचा रिपोर्ट हा 50 % ब्लॉकेजेस पासून 60-70 % ब्लॉकेजेस असा बदलू शकतो .
  • ब्लॉकेजेस ची टक्केवारी काढताना ती टक्केवारी नॉर्मल व्हेसल च्या रेफरन्स ने काढली जाते. त्यामुळे कोणता नॉर्मल सेगमेंट रेफरन्स ला घेतला आहे त्यावरही अवलंबून असते
  • काही ब्लॉकेजेस हे वेगळ्या अँगलने वेगळे दिसतात .द्विमितीय चित्रात कोन बदलला कि टक्के बदलू शकतात .
  • foreshortening , overlapping यामुळे पण दोन व्यक्तींना तीच टक्केवारी वेगळी वाटू शकते .
  • eccentric म्हणजे एकाच भिंतीला एकवटलेले ब्लॉकेजेस असतात त्याची टक्केवारी आहे त्यापेक्षा कमी सांगितली जाऊ शकते.
  • डॉक्टर च्या अनुभवाचा फरक पडतो.
  • साधारण inter observer variation हे 15- 20% पर्यंत असू शकते ,काही अडचणीच्या जागी असणाऱ्या लीजन मध्ये तर 40 % पर्यंत variation असू शकते .

निरीक्षकावर असणारे अवलंबित्व कमी करणारी दुसरी तपासणी आहे का ?? होय

  • QCA -Quantitative coronary angiography - हि अँजिओग्राफी प्रमाणेच केली जाते परंतु यामध्ये ब्लॉकेजेस मोजणारे सॉफ्टवेयर असते .
  • CTA - ही तपासणी रक्तवाहिनी मध्ये नळी न घालता ( non -invasive ) केली जाते .यात एक इंजेक्शन देऊन मग अनेक स्लाइस द्वारे इमेजेस घेऊन ब्लॉकेजेस सॉफ्टवेयर द्वारेच मोजले जातात .फक्त जिथे ब्लॉकेजेस मध्ये खूप जास्त कॅल्शियम जमा झालेले असते , त्यावेळेस हि टेस्ट उउपयोगी नसते.
  • IVUS - Intravenous Ultrasound angiography - ही तपासणी वरच्या दोन्ही तपासण्यांपेक्षा अधिक अचूक आहे .

हे झाले ब्लॉकेजेस आहेत कि नाही हे पाहणे ,पण हे ब्लॉकेजेस हार्ट अटॅक आणणार आहेत का हे सांगणारी कोणतीही तपासणी अजून तरी अस्तित्वात नाही .

ब्लॉकेजेस हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा पण अडवतात . वरती आपल्याला ब्लॉकेजेस ची संख्या आणि टक्केवारी कळली . पण 60 % ब्लॉकेजेस असतील तर ते 60% रक्तपुरवठा कमी करून 40 % रक्तपुरवठाच करतात का ?? बर आपल्याला बसल्या जागी कमी रक्तपुरवठ्याची गरज असते ( 200 ml ) तर चालायला पाळायला लागल्यावर तिप्पट ते चौपट रक्तपुरवठ्याची गरज असते . मग हे 60 % ब्लॉकेजेस दोन्ही गरजेच्या वेळेस बरोब्बर 40 % च रक्तपुरवठा करतात का ? तर रक्तपुरवठ्याचे गणित असे सरळ रेषेत नसते.

हे ब्लॉकेजेस नक्की रक्तपुरवठा कमी करत आहे का ? हे अँजिओग्राफी वरून समजत नाही .ते FFR नावाच्या टेस्ट मध्ये समजते


FFR /IFR - ( Functional flow reserve )

हि काय टेस्ट आहे ?

यामध्ये कोरोनरी मधून जाणाऱ्या रक्तप्रवाहाचा दाब मोजतात .एक बारीक प्रेशर नळी घालून ब्लोकेजेसच्या आधीचा आणि नंतरचा दाब बघितला जातो .हा दाब 0.80 पेक्षा जास्त असेल तर ब्लॉकेजेस गंभीर नाही ,ते रक्तपुरवठा अडवत नाहिये 0.80 यापेक्षा कमी असेल तर रक्तपुरवठा अडवला जातोय .

हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा मोजण्याच्या काही चाचण्या पाहू .

SPECT MPI -

यामध्ये एक radioactive tracer इंजेक्ट केला जातो. तो सर्क्युलेशन द्वारे हृदयापर्यंत पोहोचल्यावर SPECT कॅमेराने हृदयाचे त्रिमिती चित्रे काढली जातात .त्यानंतर ट्रेडमिलवर किंवा सायकलवर चालवून हृदयाला श्रम करायला लावले जाते . चालता येत नसेल तर औषधांद्वारे ह्रदयाची गती वाढवली जाते आणि मग पुन्हा 3D इमेजेस घेतल्या जातात . मग पुन्हा हृदयाचा ताण कमी झाल्यावर इमेजेस काढल्या जातात.

MPI या टेस्ट मधून काय काय समजते ?

  • हृदयाच्या 3 कोरोनरी मध्ये कुठे ब्लॉकेजेस आहेत ?
  • विश्रांती अवस्थेतल्या हृदयाला किती रक्तपुरवठा होतोय.
  • चालल्यावर हृदयाची मागणी वाढते ती पूर्ण होत आहे कि नाही . ( ischemia )
  • हृदयाच्या स्नायूंची हालचाल नॉर्मल होते आहे कि मंद होतीय कि अजिबात होतच नाहीये ( हार्ट अटॅक नंतर स्नायूचे झालेले नुकसान समजते . हार्ट अटॅक मोठा असेल तर कधी कधी खूप मोठ्या भागाचे नुकसान होते अशा वेळेस हृदयाच्या मांसपेशींना कायमचे नुकसान होते बायपास करूनही फायदा नसतो . म्हणून या तपासणीचे महत्व अशावेळेस जास्त असते .)
  • हृदयाचे पम्पिंग किती आहे ( ejection fraction )

या SPECT MPI पेक्षा जास्त accuracy असलेला PET MPI स्कॅन आहे .

स्ट्रेस 2 डी इको -

इकोकार्डियोग्राफी म्हणजे सामान्य भाषेत हृदयाची सोनोग्राफी . यामध्ये हृदयाच्या स्नायूंची हालचाल , हृदयाचा झडपांची स्थिती आणि त्यांची हालचाल हृदयाचे पम्पिंग अशा बऱ्याच गोष्टी कळतात . मात्र सध्या 2 डी इको मधून प्रत्यक्ष हृदयाला होणार रक्तपुरवठा दिसत नाही. मर स्ट्रेस 2 डी इको मध्ये रुग्णाला MPI टेस्ट प्रमाणे ट्रेडमिल किंवा सायकलवर चालवले जाते किंवा औषधाने हृदयावर ताण निर्माण करून पुन्हा सोनोग्राफी केली जाते. यामधून आपल्याला ISCHEMIA म्हणजे चालल्यावर रक्तपुरवठा कमी होतो आहे का हे समजते .


या सगळ्यांपेक्षा अगदी प्राथमिक पण सोपी टेस्ट म्हणजे स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट .यामध्ये छातीवर ईसीजी चे लीड लावून तुम्हाला ट्रेडमिल वर चालवले जाते आणि एकीकडे कॉम्पुटर स्क्रिनवर तुमचा ईसीजी हार्ट रेट बीपी मॉनिटर केले जाते . यामध्ये ईसीजीतले बदल तुमचा कमी रक्तपुरवठा दर्शवितात . मग य टेस्टचा रिपोर्ट Positive for inducible ischemia असा असेल तर रक्तपुरवठा कमी पडतोय ( इथे पॉसिटीव्ह म्हणजे चांगला रिपोर्ट नव्हे )


या सर्व तपासण्यांच्या जंजाळात आपण नक्की काय करायचे ???

काही महत्वाचे मुद्दे

  • हार्ट अटॅक आला असेल अँजिओग्राफी झाली असेल आणि पुढे अँजिओप्लास्टी / बायपास करायची कि नाही अशी द्विधा मनस्थिती असेल तर वरील पैकी तपासण्या जास्त महत्वाच्या ठरतात .
  • हार्ट अटॅक आलेला नाही थोडा त्रास झाला म्हणून जर अँजिओग्राफी फक्त केली असेल तर स्ट्रेस टेस्ट तरी किमान करून घेणे.
  • ज्यांना हृदय रोगाची फक्त शंका वाटते आहे यांनी फक्त स्ट्रेस टेस्ट आणि 2 डी इको आणि बेसिक रक्त तपासण्या एवढेच केले तरी पुरेसे आहे.त्या नॉर्मल असतील तर अँजिओग्राफी करण्याची काहीही आवश्यकता नसते


पुढच्या भागात या ब्लॉकेजेस वर ट्रीटमेंट करतात म्हणजे काय हे आपण पाहू .

या व्यतिरिक्त काही शंका असतील ,कोणत्या तपासण्या नक्की कधी करायच्या अशी शंका असेल तर या नंबरवर संपर्क साधा .


9226958538


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...