सोमवार, २६ जून, २०२३

ताक पृथ्वीवरचे अमृत

तक्रं शक्रस्य दुर्लभम् - ईंद्राला दुर्लभ असे ताक पृथ्वीवरच्या मर्त्य मानवासाठी मात्र अमृताप्रमाणे आहे. 

आयुर्वेदाने दही रोज खाऊ नये असे म्हटले आहे . पण त्याच दह्यापासून बनवलेले ताक मात्र तुम्ही सकाळ संध्याकाळ प्यायले तरी चांगले आहे. कारण दह्यामधे दुप्पट पाणी घालून घुसळण्यामुळे ते पचायला हलके होते. 

ताक जेवणाच्या आधी नंतर कसेही प्यायले तरी चालते. फक्त ते किंचित आंबट असल्याने पित्त झालेले असताना आणि दुपारी पिऊ नये.


*ताक कुणी प्यावे*

 

सर्व स्त्री पुरूष आबालवृद्ध 


*कोणत्या आजारपणात ताक चालते ?* 

शरीरावर सूज येणे 

जलोदर 

मूळव्याध 

तोंडाला चव नसणे 

ग्रहणी किंवा IBS 

अपचन

वातविकार

रक्त कमी असणे (anemia )


*ताक केंव्हा पिऊ नये* 

पित्त झालेले असताना

जखमी अवस्थेत

अशक्तपणा आलेला असताना

चक्कर येत असताना


हिवाळ्यात पावसाळ्यात रोज प्यावे . ऊन्हाळ्यात कमी प्यावे. ताक हे थंडगार नसून ते ऊष्ण असते. त्यामुळेच ते पचनाला मदत करते. 


आधुनिक आहारशास्त्रानुसार एक कपभर ताकात (245 ml ) जवळजवळ 8 ग्रॕम प्रोटीन असते. Vit D कॕलशियम आणि पोटॕशियमही असते. 


आणि म्हणूनच ऊपासाच्या दिवशी फक्त ताक प्यायले तरी चालते. किंबहुना वजन कमी करताना फक्त ताक पिऊन लंघन करण्याचा फायदा होतो. 


ईंद्राला न मिळणारे ताक रोज प्या आणि आरोग्याच्या स्वर्गसुखाचा लाभ घ्या 

@नाशिकमाधवबाग

आरोग्यासाठी संपर्क

9226958538

दही थंडगार की गरम ?

 थंडगार दही 


वाचल्यावरही ऊन्हाळ्यात गारेगार वाटले ना ? पण ते फ्रीजमधे ठेवल्याने गारेगार होते प्रत्यक्षात दह्याचा गुणधर्म ऊष्ण असतो. आधुनिक आहारशास्त्रात रोज दही खायला सांगितले आहे. पण आयुर्वेदाने मात्र कधी खावे कुणी खावे कधी खाऊ नये कुणी खाऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याच्यामागची दह्याच्या गुणधर्मानुसार कारणे पण सांगितली आहेत . आपण कारणांच्या खोलात न शिरता आधी हे पाहू कुणी खावे कधी खावे ? 

दही कुणी खावे ? 

▪️नुकतीच सर्दी झालेली असल्यास ( आश्चर्य वाटले ना ? पण जुनाट सर्दी किंवा सायनस असेल तरच खाऊ नये ) 

▪️एक प्रकारचा ताप ज्यात थंडी वाजून येते ( होय या तापात दही खा बिनधास्त ) 

▪️तोंडाची चव गेलेली असेल तर 

▪️मूळव्याधीमधे

▪️जुलाब झालेले असताना

▪️पाळी ऊशीरा किंवा अनेक महीने येतच नसेल तर

▪️गरोदरापणात 4 थ्या महीन्यात

▪️निद्रानाश 

▪️अशक्त पणा बारीकपणा

▪️सतत कुठेतरी दुखणे असणार्या वातविकारांत

होय होय दहीच खायचय वरच्या लोकांनी 


मग दही कुणी खायचं नाही बरं ? 

▪️जाड / स्थूल लोकांनी

▪️सूज येत असल्यास 

▪️कफ झालेला असल्यास 

▪️कुठूनही रक्तस्त्राव होत असताना

▪️त्वचा रोगात 

▪️डायबेटीसमधे

▪️जंत झालेले असतील तर

▪️तोंडात अल्सर्स झाले असतील तर..


बघा डायबेटीस ओबेसिटीत दही नको.


बाकी वरच्या कॕटॕगिरीत नसलेल्या  ऊरलेल्या लोकांनी काय करायचं ? 

त्यांनी शरद ग्रीष्म वसंत रूतू म्हणजे आॉक्टोबर हीट आणि ऊन्हाळा या काळात जरा कमीच खावे. बाकी पावसाळा हिवाळ्यात खावे.

शक्यतो दिवसा खावे रात्री खाऊ नये.

अशक्त बारीक माणसासाठी दही साखर तर टॉनीकवाले पक्वान्न बरं का ? 

या दह्याला टांगून ठेऊन पाणी काढून टाकले की चक्का म्हणतात . चक्का स्वरूपात त्याचे गुणधर्म वेगळे असतात .ते पुढच्या भागात पाहू.

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...