रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

सफरचंद


Eat apple a day keep doctors away 

ही म्हण सर्वांना अगदीच परिचित आहे.आयुर्वेदात सफरचंद या फळाबद्दल तशी कमी माहिती आहे. पण पाश्चात्य जगतात या फळाबद्दल भरपूर संशोधन झालेले सापडते. ते संशोधन वाचल्यावर तुम्हीही म्हणाल चला रोज सफरचंद खाऊया.

▪️सफरचंद चावून खाल्ल्याने दातांना कीड लागण्याचे प्रमाण कमी होते.

▪️सफरचंद हे neuroprotective असते त्यामुळे अल्झायमर  आणि डीमेंशिया हे आजार दूर राहण्यास मदत होते.

▪️सफरचंद चवीला गोड असले तरीही त्यात अँटी ऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल मुळे रक्तातली साखर वापरली जाऊन ती कमी होण्यास मदत होते

▪️सफरचंद खाल्याने तृप्ती (satiety ) येते व भूक कमी होते  तसेच सफरचंदात फायबर अधिक असल्याने वजन कमी करणाऱ्याने जरूर सफरचंद खावे.

▪️लिपिड म्हणजे रक्तातला मेद कमी होतो. आणि चांगले कोलेस्टे्रोल HDL वाढते.

▪️वेदनाहरण आणि जंतूनाशक गुणधर्म असल्याने कोणत्याही आजारपणात ते जरूर खावे

▪️चक्क डिप्रेशन मधेही सफरचंद उपयोगी पडते. येथे रोज सफरचंदचा ज्यूस प्यावा.


चला तर मग रोज एक सफरचंद खा डॉक्टर ला दूर ठेवा.

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

PCOD /PCOS- कारणे , लक्षणे , उपाय

                                         


 नव्या युगातील बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण स्त्रियांमध्ये आढळणारा हा मोठ्या प्रमाणात दिसणारा आजार आहे. आणि इन फर्टीलिटी चे एक मोठे कारण आहे.

PCOD म्हणजे नक्की काय?

          यामध्ये या स्त्रीच्या ओव्हरी चा आकार वाढतो आणि त्यामध्ये सिस्ट तयार होतात. त्यामुळे त्यातून हार्मोन चा बॅलन्स बिघडून स्त्री बीज निर्मिती होत नाही.(LH is icreased and FSH is decreased )

              याचे प्रमुख कारण हे चुकीचा आहार होय. अति प्रमाणात गोड आणि मैद्याचे बेकरीचे पदार्थ तळलेले पदार्थ खाणे , कर्बोदके जास्त प्रमाणात खाणे . फळे भाज्या असें फायबरयुक्त पदार्थ  आहारात कमी प्रमाणात असणे. व्यायामाचा अभाव. त्यातून शरीरातील फॅट चे प्रमाण वाढून इन्सुलिन रेसिस्टन्स येतो आणि हार्मोनचे संतुलन बिघडते.

अशा स्त्रियांमध्ये खालील लक्षणे आढळतात.

▪️अनियमित पाळी किंवा पाळीत अंगावरून खुप जाणे किंवा कमी जाणे

▪️वजन वाढणे(ओबेसिटी )

▪️मानेच्या मागच्या बाजूस मांडीच्या /आतल्या बाजूस/ काखेत त्वचा काळसर होणे. Dark skin bands 

▪️हनुवटी किंवा छातीवर केस उगवणे

▪️केस गळणे

PCOD कडे दुर्लक्ष केल्यास पुढे इन्सुलिन resistance मुळेडायबेटीस होऊ शकतो , रक्तदाब वाढू शकतो

उपाययोजना

आहारात बदल- कर्बोदके कमी घेणे , बेकारीचे पदार्थ तळलेले पदार्थ गोड पदार्थ बंद करणे . फळे भाज्या यांचा आहारात समावेश करावा .जंक फूड टाळावे 

नियमित व्यायाम - चालणे , सायकलिंग , पोहोणे , सूर्यनमस्कार , एरोबिक्स यापैकी काहीही एक नियमित करावे 

गरज पडल्यास औषधे आणि पंचकर्म . पंचकर्म आणि वनस्पतीज औषधे हार्मोनचे  संतुलन करायला उपयोगी पडतात . तज्ञ वैद्य यांना दाखवून मगच चालू करावे 


For

Free diet Consultation for PCOD 

Guidance based on Ayurveda

Call

नाशिक माधवबाग- 9226958538

डॉ.आनंदी साठ्ये - M.D.( AYURVED )




ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...