दिवाळी आणि अभ्यंग स्नान असे समीकरण लहानपणापासून मनात बसलेले असते.पण आयुर्वेदाने मात्र हे अभ्यंग दिवाळीपुरते न ठेवता नित्य म्हणजे नेहमी करायला सांगितले आहे.
आता अभ्यंग म्हणजे नक्की काय ? तर तेलाने केलेला पूर्ण शरीराचा मसाज. अभ्यंग स्नेहन.
हे शरीरावर कसे काम करते ते पाहूया. सुश्रूत नावाच्या ग्रंथकाराने अभ्यंगाचा परीणाम त्या त्या धातूपर्यंत पोचवण्यासाठी किती काळ मसाज करावा हेही सांगितले आहे. म्हणजे किती वेळ मसाज केला कि शेवटपर्यंत पोहोचेल ? त्याच्या फार तांत्रीक डिटेलमधे न जाता येवढे लक्षात ठेऊ या किती आंगावरच्या केसांपासून हाडांमधल्या मगजापर्यंत पोचायला 65 सेकंदांपासून ते 285 सेकंदांपर्यंतचा कालावधी लागतो. या हिशेबाने सर्व शरीराच्या सूक्ष्म स्तरापर्यंत जाण्यासाठी 30 ते 35 मिनीटांचा कालावधी पुरेसा आहे.
आता मुद्दा असा आहे की हे तेल खारच आतपर्यंत मुरते का ?
आधुनिक शास्त्रानुसार शरीरातले सेल मेंब्रेन हे लिपीड आणि प्रोटीन यांनी बनलेले असते . मसाज आॕईल हे लिपीड असल्याने त्वचेमधून पटकन शोषले जाते. यामधे बरीच मतमतांतरे असली तरी आयुर्वेदात हजारो वर्षांपासून अभ्यंग स्नेहनाचा वापर स्वास्थ्यरक्षणासाठी आणि ऊपचार म्हणूनही केला जातो.
जेंव्हा अभ्यंग केले जाते तेंव्हा अनेक गोष्टी शरीरावर काम करतात. मसाज करताना दिले जाणारे प्रेशर , स्पर्श , तेलामधली औषधे ई. सर्वच गोष्टी या शरीरावर परिणाम करत असतात .अभ्यंग हे आरोग्यासाठी करतो आहे की ऊपचार म्हणून यावर दिले जाणारे प्रेशर, मसाजचा कालावधी आणि औषधी तेलाचा प्रकार हे बदलत असतात.
साध्या तीळतेलाच्या अभ्यंगाने शरिरावर काय परीणाम होतात हे पाहू ?
1. जराश्रमवातहा - म्हणजे नियमित अभ्यंग हे म्हातारपण लांब ठेवते. श्रम दूर करते . वाढलेला वात दूर करते वात म्हणजे शरीराची झीज किंवा ठिकठिकाणचे दुखणे. झीज कमी होते आणि स्नायू सांधे यांचे दुखणे कमी होते
2. दृष्टीप्रसादपुष्ट्यायु - दृष्टी सुधारते. आयु पुष्टी येते म्हणजे ताकद वाढून आहे त्यापेक्षा कमी वय वाटू लागते.
3. स्वप्नसुत्वक्दार्ढ्यकृत- शांत झोप लागते . त्वचेचा लूझनैस कमी होतो.सुरकुत्या कमी होतात.
आता हेच अभ्यंग तैल औषधी युक्त घेतले तर ऊपचार म्हणून ऊपयोगी पडते . वाढलेल्या वयातील झिजलेल्या स्नायूंवर टेंडॉन सांधे लीगॕमेंट यांच्या दुखण्यावर सांध्यांच्या दुखण्यावर त्या त्या दुखण्यात झालेले बदल बघून वैद्य ठरवतात कि अभ्यंगासाठी कोणते तेल वापरावे .
नुकताच मार लागला असेल , अचानक सूज आली असेल आणि ती ठसठसत असेल तर मात्र मसाज करू नये मात्र मार लागून अनेक दिवसानंतर दुखणे तसेच राहिले असेल तर त्यावेळेस स्नेहानाचा उपयोग होते. तसेच ताप सर्दी खोकला असे infectious disease झाले असतील तर मसाज करू नये.
अभ्यंगानंतर स्वेदन केले तर स्नेहनाचे फायदे वाढतात. घराच्या घरी अभ्यंग करत असाल तर अभ्यंगानंतर गरम पाण्याने स्नान करावे.
अभ्यंगासाठी वेळ नसेल तर हिवाळ्यात तेल लाऊन अंघोळ करावी , आठ पंधरा दिवसाने आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये जाऊन करून घ्यावे.
लक्षात ठेवण्याची गोष्ट अभ्यंग करावे-
To relax body and mind
To relieve muscle pain
To strengthen ligament, muscle, joints and tendons
To improve skin quality and skin complexion
Dr Anandi Sathaye
MD Ayurved
9226958538