हाॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना सतिशरावांच्या सौ.ने डॉक्टरांना विचारले ," यांना काय खायला चालेल आणि काय नाही ते लिहून देता का ? "
डॉ . हसून म्हणाले , "सतिशराव बरे झालेत आता. सगळं खाऊ दे. फक्त तेलतूप कमी खा म्हणजे झाले "
अगदी आताआता पर्यंत आधुनिक शास्त्राचे डॉ. हाच सल्ला देत आलेले आहेत. अलिकडे पेशंटला डाएटीशीयनकडे पाठवतात किंवा डाएटीशीयनचे प्रीस्क्रीप्शन जोडले जाते. जर डॉक्टरांना विचारले काय खाऊ काय नको तर ते फारच मोघम सल्ला अजूनही देतात.
पण तेच तुम्ही आयुर्वेद पदवीधर डॉ.कडे गेलात तर ते तुम्हाला काय खायचे नी काय नाही याची लीस्ट स्वतःच लिहून देतात ,चर्चा करतात, समजाऊन सांगतात ज्याला आयुर्वेदाच्या परीभाषेत 'पथ्य्यापथ्य' असे म्हणतात.
याचं कारण म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेताना असलेला फरक. आधुनिक वैद्यक शिकताना न्यूट्रीशन /डाएट याला फार महत्त्व दिलेलेच नाहीये. किंबहूना त्यांची न्यूट्रीशन, फूड सायन्स अशी स्वतंत्र शाखा विकसित होत गेली. पण ती वैद्यकीय शिक्षणापसून स्वतंत्र अशी.
आयुर्वेदाच्या शिक्षणामधे स्वस्थवृत्त नावाचा स्वतंत्र विषय तर आहेच शिवाय औषधी वनस्पतींच्या गुणधर्मासोबत आहारीय पदार्थांचेही गुणधर्म सांगितले आहेत. सगळ्यात महत्वाचे प्रत्येक रोगात औषधोपचारासोबतच निदान परीवर्जन आणि पथ्यापथ्य या दोन महत्वाच्या गोष्टी बरे होण्यासाठी सांगितलेल्या आहेत.
निदान परीवर्जन म्हणजे ज्या कारणामुळे रोग झाला त्या कारणापासून दूर राहणे .
प्रत्येक रोगामधे त्या त्या रोगाचे वेगळे पथ्यापथ्य सांगितलेले आहे. पथ्यापथ्याचे महत्व आयुर्वेदात ईतके आहे की एक ‘पथ्यापथ्यविनिर्णय’ नावाचा ग्रंथ फक्त या पथ्यापथ्याला वाहिलेला आहे. यात पथ्यापथ्याचे महत्व सांगताना दोन श्लोक आलेले आहेत ते आपण पाहू.
पथ्ये सति गदार्तस्य भेषजग्रहणेन किम् |
पथ्येsसति गदार्तस्य भेषज ग्रहणेन किम् |
म्हणजे आजार बरे करायला जर तुम्ही पथ्य पाळले तर औषधाची गरजच काय ? आणि जर तुम्ही पथ्य पाळले नाही तर (फक्त ) औषध घेऊन ऊपयोगच काय ? ?
नी दुसरा असाआहे
विनाsपि भैषज्यैर्व्याधी पथ्यादेव निवर्तते |
न तू पथ्यविहीनस्य भेषजानाम् शतैरपि |
औषधांशिवाय केवळ पथ्याने सुध्दा आजार दूर होऊ शकतो .आणि जर पथ्यच नसेल तर शंभर औषधे देऊन पण रोग बरा होत नाही.
खरोखरी काही रोग हे सुरूवातीच्या अवस्थेत असताना फक्त पथ्याने बरे होतात नी गंभीर जुन्या आजारात विशेषतः हृदयरोग मधुमेह स्थौल्य ऊच्चरक्तदाब यांमधे औषधे पंचकर्मासोबत आहारनियोजन कडक पाळले तर औषधविरहीत आयुष्य जगता येते हा माधवबागेचा अनुभव आहेच.
म्हणूनच माधवबाग पंचकर्मासोबत डाएट कीट रूग्णांना देते. ज्यामुळे पथ्य 100% पाळले जाते त्यामुळे रोग लवकर आटोक्यात येतो तसेच रोग पूर्ण बरा होण्याची शक्यता १०० % कडे झुकण्यास मदत होते.
तसा हल्ली डाएट या शब्दाचा खूपच बोलबाला झालेला आहे. तुम्ही वजन कमी करणे किंवा डायबेटीस बरा करण्यासाठी नेटवरती शोधाशोध केली तर पाच पन्नास प्रकारचे डाएट तुम्हाला दिसतील . लो कॅलरी डाएट , लो फॕट डाएट , लो कार्बोहायड्रेट्स डाएट , इंटरमिटंट फास्टींग , ATIKINS डाएट , दीक्षित डाएट , DASH डाएट , KETOGENIC डाएट , GLUTEN FREE डाएट इ.इ. असंख्य प्रकार.
पण COSTOMIZED डाएट प्लान तुम्हाला आयुर्वेदच देऊ शकतो. तुमची प्रकृती ,सत्व, सात्म्य आणि रोग एवढे सर्व पाहून प्रत्येक व्यक्तीला दिल्या जाणार्या सल्ल्यात सल्ल्यात सूक्ष्म फरक असतो .
पथ्याचे महत्व कायम लक्षात ठेवा . पथ्य हा शब्द पथ म्हणजे मार्ग या शब्दावरून आलेला आहे , पथ्य म्हणजे आरोग्याकडे जाणारा मार्ग.
पूर्वी सासरी जाणार्या मुलीला सल्ला दिला जायचा सासराच्यांना खूश ठेवण्याचा मार्ग पोटातून जातो. तसाच आता हा नव्या युगाचा सल्ला. कुटूंबाच्या आरोग्याचा मार्ग पोटातूनच जातो. दोनही मार्ग पोटातूनच जातात पण त्या मार्गावरून जाणारे पदार्थ महत्वाचे हे तुम्हा सूज्ञांस सांगणे न लगे........
डॉ. आनंदी साठये
एम्.डी. आयुर्वेद
