शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

अँजिओप्लास्टीचा ब्लॉकेजेसवर होणारा परिणाम

 


  • अँजिओप्लास्टी म्हणजे काय ? वैद्यकीय भाषेत याला ptca ( percutaneous transluminal coronary angioplasty) म्हणतात.


अँजिओप्लास्टी मध्ये ब्लॉकेजेस काढले जातात का ?

नाही . मग नक्की काय केले जाते ??


  • हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत ब्लॉकेजेस पर्यंत एक गाईड वायर जाते . ब्लॉकेजेस पाशी एक फुगा फुगवला जातो त्यामुळे ब्लॉकेजेस दाबले जातात , त्यावरचे आवरण ब्रेक होते आणि रक्तवाहिनी किंचित विस्फारली जाते .आतले अस्तर किंचित फाटते. रक्तवाहिनी लवचिक असते फुगा काढून टाकल्यावर ती परत मूळ पदाला येऊन आकुंचन पावते, तसे होऊ नये म्हणून त्यानंतर स्टेण्ट बसवले जातो ,त्यामुळे विस्फारलेली रक्तवाहिनी विस्फारलेलीच राहते . आता हि एक प्रकारची कंट्रोल्ड इंज्युरी झालेली असते रक्तवाहिनीला , त्यातून रक्ताची गुठळी बनू शकते जी हार्ट अटॅक आणू शकते म्हणून प्लास्टी नंतर पुढे 3 ते 6 महिने पोटातून रक्त पातळ करणारी औषधे घ्यावी लागतात . या रक्तवाहिनीला स्टेंट मुळे झालेली बारीकशी जखम भरताना तिथे पुन्हा ब्लॉकेजेस तयार होऊ नये म्हणून त्या स्टेण्टवर औषधे बसवलेली असतात . ( DES -drug eluded stent ) .


या सर्व प्रोसिजर मध्ये ज्या ब्लॉकेजेस वर आपण ट्रीटमेंट केली त्या ब्लॉकेजेस चे काय झाले ? निघाले का ते ??


  • ते ब्लॉकेजेस दाबले गेले थोडे ब्रेक पण झाले आणि आतल्या अस्तरात ढकलले गेले .
  • lipid core may remain - म्हणजे ब्लॉकेजेस चा गाभा जो लिपिड म्हणजे मेद ( कोलेस्टेरॉल ) साचून बनलेला असतो तो तसाच राहू शकतो .


अँजिओप्लास्टी चा दीर्घकालीन परिणाम

  • रक्त वाहिन्यातील ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया तशीच चालू राहाते .
  • इतर ठिकाणी ब्लॉकेजेस होऊ शकतात .
  • स्टेण्ट च्या ठिकाणी पण नवीन ब्लॉकेजेस होण्याची शक्यता असते .


  • यात ब्लॉकेजेस असलेला रुग्ण जर मधुमेही असेल तर रक्तवाहिनीच्या आतून आधीच सूज जास्त असते , प्लास्टी नंतर झालेली बारीकशी जखम भरण्याची प्रोसेस अचानक भरभर होऊ शकते. मधुमेही लोकांमध्ये ब्लॉकेजेस ची लांबी जास्त असते अशावेळेस स्टेण्ट ने पूर्ण लांबीचे ब्लॉकेजेस कव्हर होत नाहीत .मधुमेही रुग्णाची साखर सतत वर खाली होत असेल तर प्लास्टी नंतर पण ब्लॉकेजेस अस्थिर राहू शकतात . तसेच बारीक रक्तवाहिन्यांचे जास्त नुकसान झालेले असते . त्यामुळे मधुमेही रूग्णांना अँजिओप्लास्टी चा नक्की काय फायदा होतो हा प्रश्न आहेच .


या अन्जिओप्लास्टीने हृदयरोगाला नक्की काही फरक पडतो का ? फरक पडत असेल तर किती वर्षे पडतो ??


आपण समजा ब्लॉकेजेस असलेले काही पेशंट घेतले ज्यांना स्टेबल म्हणजे हार्ट अटॅक आलेला नाहीये असे पेशंट , यात काही पेशंटची अँजिओप्लास्टी केली काहींना नुसते औषधावर ठेवले तर दोन्ही ग्रुपमध्ये तुलना केली तर काय सापडेल ??


बघूया काही प्रसिद्ध संशोधन


COURAGE ट्रायल 2007 निष्कर्ष थोडक्यात

2287 स्टेबल ब्लॉकेजेस असलेले रुग्ण समाविष्ट

ग्रुप 1 - PCI ( अँजिओप्लास्टी ) + औषधे

ग्रुप 2- फक्त औषधे आणि जीवनशैली बदल

मुख्य निष्कर्ष :

1.मृत्यू - दोन्ही गटात फरक नाही

2.हार्ट अटॅक (MI) - महत्वपूर्ण फरक नाही

3.छातीत दुखणे (angina) - प्लास्टी नंतर सुरुवातीला जास्त बरे वाटले

4. 15 वर्षांनंतरहि मृत्य व हार्ट अटॅक मध्ये वरील प्रमाणेच निष्कर्ष


BARI 2D ट्रायल 2008

( Bypass Angioplasty Revascularization Investigation 2 Diabetes )

कालावधी -5.3 वर्षे

type 2 मधुमेह आणि स्थिर ब्लॉकेजेस असणारे 2368 रुग्ण समाविष्ट

ग्रुप 1- प्लास्टी किंवा बायपास + औषधे

ग्रुप 2- फक्त औषधे

मुख्य निष्कर्ष -

  1. एकूण मृत्यदंर - दोन्ही गटात फरक नाही
  2. एकूण हार्ट अटॅक (MI )- दोन्ही गटात फरक नाही .
  3. काही रुग्णांना अनेक रक्तवाहिन्यांत ब्लॉकेजेस होते त्यांची बायपास केली त्यांना तुलनेत कमी हार्ट अटॅक ( non fetal MI ) आले औषधी ग्रुप पेक्षा . किती कमी ? तर औषधी घेत असलेल्या रुग्णांपैकी 17.6 % लोकांना गंभीर नसलेले हार्ट अटॅक अले तर बायपास झालेल्या रुग्णांपैकी 10 % लोकांना गंभीर नसलेले हार्ट अटॅक आले .( मात्र मृत्यदरात फरक नव्हता )



FAME 2 ट्रायल

Fractional flow reserve - guided PCI vs medical therapy

FFR हि टेस्ट म्हणजे काय आपण मागच्या लेखात पहिले आहे.

ग्रुप 1- FFR टेस्ट नंतर जे ब्लॉकेजेस रक्तपुरवठा अडवत आहेत अशा ब्लॉकेजेस वरच प्लास्टी केली असे 447 रुग्ण होते .

ग्रुप 2- रक्तपुरवठा अडवणाऱ्या ब्लॉकेजेस चे रुग्ण फक्त औषधे घेत होते अ से 441 रुग्ण घेतले .


प्रमुख निष्कर्ष

पहिल्या 2 वर्षात

  1. हार्ट अटॅक - पहिला ग्रुप - 8% दुसरा ग्रुप - 12 %

पुढच्या 5 वर्षात

  1. हार्ट अटॅक - पहिला ग्रुप 8 % दुसरा ग्रुप - 13%

लक्षणांमुळे किंवा ecg बदलामुळे तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करून प्लास्टी करण्याची गरज पडली असे -

पहिल्या 2 वर्षात - पहिला ग्रुप - 4 % दुसरा ग्रुप - 16.3 %

5 वर्षात - पहिला ग्रुप -6-7 % दुसरा ग्रुप 21-22 %

पूर्ण 5 वर्षात दोन्ही ग्रुपच्या मृत्यदारमध्ये फरक नव्हता .


ISCHEMIA ट्रायल (2020)

Inernational Study of Comparitive Health Effectiveness with Medical and Invasive Approaches

स्थिर ब्लॉकेजेस आणि हृदयाला मध्यम ते गंभीर रक्तपुरवठा कमी असणारे (ischemia ) रुग्ण -5179

ग्रुप 1- Invasive ग्रुप यात नुसती अँजिओग्राफी झालेले 345 , प्लास्टी झालेले 1852 तर बायपास झालेले 391 जण होते

ग्रुप 2- स्थिर ब्लॉकेजेस आणि ischemia असलेले 2591 जण ज्यांनी फक्त औषधोपचार केले


मुख्य निष्कर्ष

  1. मृत्यू / हार्ट अटॅक /तातडीने ऍडमिट /हार्ट फेल्युअर - दोन्ही ग्रुप मध्ये फरक नाही
  2. छातीत दुखणे - ग्रुप 1 मध्ये थोडेसे कमी झाले .


या सर्व संशोधनांच्या निष्कर्षांमधून काय जाणवते ?? स्टेबल ब्लॉकेजेस च्या रुग्णांना प्लास्टी करून कोणाही अतिरिक्त फायदा होत नाही औषधाने जेवढा फायदा होतो तेवढाच .


आता अजून एक संशोधन पाहू

Exercise-based cardiac rehabilitation (CR) for coronary artery disease (CAD)

हा एक cochrane database systemic review आहे. यात एकूण 85 ट्रायल्स ( 23430 सहभागी हार्ट रुग्ण ) मधून काढलेला निष्कर्ष आहे . याचे थोडक्यात महत्वाचे निष्कर्ष असे -

स्टेबल ब्लॉकेजेस च्या रुग्णांनी व्यायामावर आधारित जीवनशैली बदलली तर काय फरक पडतो ?

कोणत्याही कारणाने हॉस्पिटल मध्ये भरतीचे प्रमाण - 42% ने कमी झाले .

हार्ट अटॅक चे प्रमाण - 28 % ने कमी झाले .

मृत्यूचे प्रमाण - 13 % ने कमी झाले .


तुमची अँजिओग्राफी झाली आहे का ?? मग खालील गोष्टी लक्षात ठेवा


  • ब्लॉकेजेस किती आहेत या पेक्षा ते रक्तपुरवठा अडवता आहेत का हे पाहाणे गरजेचे आहे .
  • ब्लॉकेजेस रक्तपुरवठा अडवता आहेत कि नाही यासाठी FFR ही तपासणी किंवा अधिक ऍडव्हान्स तपासण्या करणे शक्य नसेल तर स्ट्रेस टेस्ट आणि 2 डी इको कार्डियोग्राफी तरी नक्की करून घ्यावी
  • तातडीचा कोणाही त्रास नसेल तर कितीही ब्लॉकेजेस असतील तरी जीवनशैली बदलणे आणि गरजेनुसार औषधे घेणे हाच सर्वप्रथम योग्य मार्ग आहे.

ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी किंवा ते अस्थिर असतील तर स्थिर ( स्टेबल ) करण्यासाठी ते कसे झाले हे बघणे महत्वाचे असते , जे आपण आधीच्या लेखात बघितले . आता पुढच्या लेखापासून ब्लॉकेजेस निर्माण होण्यास करणीभून असणारे सर्व घटक विस्ताराने बघणार आहोत. नुसते बघणार नाही तर त्यावर उपचारही बघणार आहोत .

तुमची अँजिओग्राफी झाली असेल आणि तुम्हाला काही शंका असतील / तुमच्या रिपोर्ट बद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे असेल तर खालील क्रमांकावर संपर्क करा . या नंबरवर तुम्ही तुमचे रिपोर्टही पाठवू शकता .


नाशिक पंडित कॉलनी नाशिक रोड माधवबाग

9226958538

9226403518


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...