उठा उठा दिवाळी आली
अभ्यंग स्नानाची वेळ झाली .
हल्ली अभ्यंग स्नान हे दिवाळीपुरतेच उरलेय नाही का ? अभ्यंग आणि पहाटे उठणे या दोन शब्दांशी दिवाळीचा संबंध येतो खरा पण हा आयुर्वेदातल्या दिनचर्येचा भाग आहे. अभ्यंग म्हणजे स्नेहन म्हणजे हल्लीचा मसाज होय. मात्र तेलाने केलेला मसाज होय. आयुर्वेदात ग्रीष्म ऋतु म्हणजे कडक उन्हाळा सोडून बाकी सर्व ऋतुत रोज अभ्यंग करायला संगितले आहे. विशेषत: हेमंत ऋतुत म्हणजे थंडीत त्याचे जास्त महत्व आहे. आणि म्हणूनच थंडीत येणारा सण दिवाळीतल्या परंपरेमध्ये अभ्यंगाचा समावेश झालेला दिसतो. नित्य अभ्यंगामुळे म्हातारपण दूर ढकलले जाते , त्वचा तजेलदार राहाते , श्रम नाहीसे होतात , स्नायू पुष्ट होतात , झोप चांगली लागते. शरीर दृढ म्हणजे घट्ट आणि क्लेशसह म्हणजे त्रास सहन करता येईल इतके मजबूत होते . नित्य अभ्यंग करावयाचे तर घरच्या घरी अंघोळीच्या आधी तिळाचे तेल लावून करू शकता .अभ्यंग म्हणजेच स्नेहन या उपचाराचा वापर अनेक व्याधींमधे होतो. मात्र ते आयुर्वेद प्रॅक्टीस करणार्या डॉक्टर च्या सल्यानेच करावे . कारण काही अवस्थेमध्ये स्नेहन करू नये असेही संगितले आहे.
माधवबागेने याच स्नेहन उपचाराचा अंतर्भाव आपल्या संशोधनसिद्ध चिकित्सापद्धतीत केलेला आहे. आणि सर्व प्रकारचे जीवनशैलीचे रोग या चिकित्सापद्धतीने बरेही करता येतात असेही सिद्ध केले आहे.
हे सर्व अभ्यंगविषयी. दिवाळीत दूसरा संदर्भ येतो तो पहाटे उठण्याविषयी. अर्थात आयुर्वेदाने रोजचं ब्राह्म मुहूर्तास उठावे असे म्हटले आहे . ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी जवळजवळ दीड तास . हल्ली पहाटे उठून अभ्यास करण्याची पद्धत इतिहासकालीन ठरलीय . अभ्यासाठी नाईट मारत म्हणजे रात्रभर जागणारी आताची तरुण पिढी . पण मुळात लवकर का उठायचे हा या पिढीचा प्रश्न असतो . मग या मागचे कारण समजावून घेऊ .
दिवस आणि रात्र मिळून 24 तासात प्रत्येक साधारण चार तासाने शरीरातील दोषप्राबल्य बदलत असते. (मागच्या एका लेखात मी आयुर्वेदातील वात पित्त कफ या दोषांबद्दलसांगीतलेले आठवत असेल.) खालचा रंगीत तक्ता बघून तुमच्या लक्षात येईल की सूर्योदयाआधी वात दोषाचा काल असतो . सूर्योदयानंतर लगेच कफ काल सुरु होतो. मग सकाळी १० नंतर दोन वाजेपर्यंत पित्त काल असतो , ज्या काळातच जेवण झाले पाहिजे. मग दोन नंतर परत वात पित्त कफ असे उरलेल्या वेळेत दोषप्राबल्य असते
पहाटे २ ते सकाळी ६ या वातकाळात उठले तर उत्साह असतो शारीरिक गती सुरू झालेल्या असतात. त्यामुळे मन ही जागृत झालेले असते. त्यामुळेच या काळात केलेला अभ्यास लक्षात राहात असावा. सूर्योदयानंतर कफ काळ चालू होतो . मग थोडी एनर्जि मंदावलेली असते. अशा वेळेस उठायचे झाल्यास परत झोपायची इच्छा होते. ज्यांना पोट साफ न होण्याची तक्रार असते त्यांनी तर वात काळातच उठले पाहिजे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी सकाळच्या कफ काळात( ६ ते १० ) भरपूर घाम गाळला पाहिजे. आता ६ ते १० म्हणजे नाश्त्याची वेळ . मग नाश्ता कुणी करावा कुणी करू नये नि नक्की किती नि काय खावे हा सल्ला त्या व्यक्तीच्या प्रकृतीमधला दोष आणि रोग हे पाहूनच द्यायला लागेल , अशा प्रकारे या दोषघड्याळाचा उपयोग स्वास्थ्य रक्षणासाठी तर आहेच पण एखादा आजार झालेला असताना त्या आजारात सुरूवातीला कोणता दोष वाढलेला आहे या वरुन आयुर्वेद तज्ञ तुम्हाला नुसती दिनचर्या बदलून पण बरे करू शकतो. पण दिनचर्या बदलायला आपण सहजा सहजी तयार होत नाही म्हणून मग औषधांची गरज पडते . प्रत्येकाची दोष प्रकृतीनुसार दिनचर्या सांगता येणे शक्य आहे . कोणत्या प्रकृतीला जागरण केलेले सोसणार आहे , कुणी कधीतरी उशिरा पर्यन्त झोपलेले चालू शकते वगैरे वगैरे. परत निसर्गाचेही एक घड्याळ असते . ज्याला आपण ऋतु असे म्हणतो . एका वर्षात जे सहा ऋतु असतात त्यातही वेगवेगळे दोष कमी अधिक असतात.( त्या विषयी नंतर सविस्तर लिहिणारच आहे )
म्हणजे बघा ,दिवसाच्या प्रहरामधले दोष , त्या त्या ऋतूंमांधले दोष , व्यक्तीच्या प्रकृतीमधले दोष इतक्या सर्वांचा विचार केला तर प्रत्येकाचा व्यक्तीगत वैद्यकीय सल्ला हा वेगवेगळा असणार नाही का ? आयुर्वेद इतका सूक्ष्म रीतीने वैयक्तिक विचार करते.
दिवस भरातले दोष चक्र -
राऊंड द क्लॉक शरीरातील दोष स्थिति बदलणे म्हणजेच हे शरीरातले बॉडी क्लॉक होय. हेच बायोलॉजिकल क्लॉक . याला circadian र्हीदम असे म्हणतात
1729 मध्ये, फ्रेंच शास्त्रज्ञ जीन-जॅक डी'ऑर्टस डी मायरन यांनी दैनंदिन उत्तेजनांच्या प्रतिसादापासून अंतर्गत घड्याळ वेगळे करण्यासाठी पहिला प्रयोग केला. मिमोसा पुडिका या वनस्पतीच्या पानांच्या हालचाली (जरी झाडे सतत अंधारात ठेवली तरी ) कायम राहिल्याचे त्यांनी नमूद केले. हा बायोलोजिकल क्लॉक चा पहिला शोध. त्या नंतर फळ मशीवर काही प्रयोग झाले Drosophila circadian rhythm have paved the way for
understanding circadian behaviour and diseases related to sleep-wake conditions
in other animals, including humans.
2017 मध्ये discoveries
of molecular mechanisms controlling the circadian rhythm या शोधासाठी Jeffrey
C. Hall, Michael Rosbash आणि Michael
W. Young या दोघांना नोबेल प्राइज मिळाले.
काय सांगतो हा circadian rhythm??
The circadian clock anticipates and adapts our physiology to the different phases of the day. Our biological clock helps to regulate sleep patterns, feeding behavior, hormone release, blood pressure, and body temperature. अजून या शोधाचा उपयोग तसा वैद्यकीय क्षेत्रात रोजच्या प्रॅक्टीस मध्ये फारसा नाही .
आपल्या भारतीयांपैकी बरेच जण आयुर्वेदावर पूर्ण विश्वास ठेऊन असतात . पण काही जण मात्र संशोधन झालय का असे विचारत असतात.जे फार बारकाईने चिकित्सा करणारे आहेत त्यांच्यासाठी वरचे दोन रंगीत फोटो आहेत.
बाकी काय दिवाळीला पहाटे उठला असाल तर ती रोजचीसवय लावून घ्या. अभ्यंग केले असेल तर पुढेही चालू ठेवा . वैयक्तिक दिनचर्येचा सल्ला हवा असेल तर तो आयुर्वेद डॉक्टर तुमची प्रकृती तपासून मग नक्की देतील.
सर्वेSपि सुखीन: संतु .....
डॉ. आनंदी साठये . एम.डी. ( कायचिकित्सा )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा