उपवास –
उपवास म्हणजे आयुर्वेदातील लंघनाचाच एक प्रकार आहे. बर्याच रोगांमध्ये लंघन उपयोगी असते . ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना वैद्यकीय दृष्ट्या लंघन चालते त्यांनी उपवास कडक करायला हरकत नाही. पण मग बाकीच्यांनी काय खावे बरे ?
आषाढी /कार्तिकी एकादशी , चतुर्थी , असे धार्मिक उपवास बरेच जण करतात.पण मग बरेच वेळा एकादशी दुप्पट खाशी अशी म्हणच खरी करायची वेळ येते. ते होऊ नये म्हणून आपल्याकडे पारंपारिक रित्या जे उपवासाचे पदार्थ आहेत त्यातल्या काही पदार्थांची माहिती तुम्हाला करून देणार आहे.
भगर – याला वरीचे / वरइचे तांदूळ असे म्हणतात. काही भागात तांदुळाच्या भाताऐवजी याचाच भात खातात .याला संस्कृत मध्ये श्यामाक असे म्हटले आहे. भगर पचायला हलकी असते. भगर पित्तकारक असते असा एक गैरसमज आहे. परंतु आयुर्वेदात भगर थंड सांगितली आहे. अति पोषण ( स्थौल्य ) झाल्यानंतर वजन कमी करण्यासाठी जे आहारीय पदार्थ वर्णन केले आहेत त्यात भगरीचा उल्लेख आहे. भगर हि आयुर्वेदात तृणधान्यांमध्ये सर्वोत्तम सांगितली आहे. पचायला हलकी आणि रुक्ष शोषण करणारी असल्याने लंघनाचे सर्व हेतू भगर खाऊन साध्य होतात. त्यामुळे उपवासाला उत्तम . याच कारणाने स्थौल्य आणि डायबेटीस , हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये चालणार आहे.
राजगिरा - याला amaranth म्हणजे ग्रीक भाषेत immortal असे म्हटले आहे. राजगिर्याला रामाचे धान्य असे म्हणतात. राजगिर्याचे पोषण मूल्य ऊच्च दर्जाचे आहे. ग्लुटेन फ्री असून त्यात फॉस्फरस पोटॕशियम कॕलशियम प्रोटीन्स आणि फायबर असतात. आयुर्वेदात राजगिरा पचायला जड सांगितला आहे मात्र त्याच्या लाह्या पचायला हलक्या असतात. राजगिर्याच्या लाह्यांच्या पीठाचे पदार्थ बनवून खावे. डायबेटीस नसेल , वजन प्रमाणात असेल तर आणि लहान मुलांसाठी राजगिर्याचा लाडू हा अत्यंत पोषक पदार्थ समजता येईल. मात्र ऊपवासाच्या दिवशी हा प्रमाणातच खावा.
शिंगाडा.
हाही एक ऊपवासातला पदार्थ आहे ज्याला ईंग्रजीत water chestnut असे म्हणतात. हाही अत्यंत पोषक असा पदार्थ आहे . यातही बी व्हीटॕमीन्स पोटॕशियम मॕगेनीज कॉपर रीबोफ्लेविन अशी सूक्ष्म पोषकतत्वे असतात. आयुर्वेदातही हा पोषकच सांगितला आहे. पचायला जड थंड असून ग्राही म्हणजे लूज मोशन होत असताना द्यावयाचा पदार्थ आहे. त्यामुळे खरे तर शिंगाडा ऊपवासाला जपूनच खावा.
साबूदाणा या अत्यंत आवडीच्या पदार्थाबद्दल खूप काही लिहीलं बोललं गेलय त्यामुळे त्याची माहीती ईथे मुद्दामच टाळलीय.
ऊपवासाचे पदार्थ असे काही आयुर्वेदात वर्णन नाही. एखादा पदार्थ ऊपवासाला का चालतो नी एखादा का नाही ? खरे तर पचायला हलके पदार्थच फक्त ऊपवासात चालायला हवे. पण असे प्रत्यक्षात दिसत नाही. परंपरेने अनेक पदार्थ ऊपवासाला चालणार्या यादीत हळूहळू समाविष्ट झालेले दिसतात.
'काय खावे' या पेक्षा ऊपवास 'का करतोय' या हेतूकडे जास्त लक्ष दिले तर काय खावे हा प्रश्न प्रत्येकाला आपल्यापुरता सोडवता येईल.
धार्मिक कारणासाठी ऊपवास करताना तुम्ही आरोग्यपूर्ण असाल तर मग ऊपासाच्या पदार्थांच्या रेसिपी असा भरपूर वाव आहे.
पण धर्मासोबत आरोग्याची आकांक्षा असेल तर कमी सात्विक अन्न खावे . सात्त्विक आणि हलके या रकान्यात फळे , साय काढलेले दूध ,ताक येवढ्या गोष्टी नक्की बसतात. मग एक दिवस फक्त पातळ पदार्थ आणि फळांवर राहील्यावर किती हलकेपणा येतो ते अनुभवून जरूर बघा.
बिपी डायबेटीस हृदयविकार असणार्यांनी ऊपवास करू नये असा गैरसमज आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरांनी ईतका रूजवला आहे की तो मनातून काढता काढता कठीण जाते. हे वरचे रोगी नक्कीच ऊपवास करू शकतात. ऊलट काही वेळेस तर ऊपवासाने सुद्धा रोगाची तीव्रता कमी होते.मात्र योग्य त्या वैद्यांचा सल्ला घेऊनच या प्रकारच्या रूग्णांनी ऊपवास करावा.
तुम्हाला ऊपवास कसा करायचाय पण त्याबद्दल मार्गदर्शन हवे असल्यास खालील नंबरवर वाॕट्सप करावे.
9226958538

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा