तूप
लोणकढं तूपच खाताय ना तुम्ही ?
आपल्या भारतीय जेवणामधे पार हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत जेवणासोबत तूप खायची वर्षानुवर्षांची सवय आहे.
आहे ? ? कदाचित होती म्हणावी लागेल. कारण कोलेस्टेरॉल नावाचा बागूलबोवा आपल्या मानगुटीवर बसवला गेला ज्यामुळे अनेक जणं भातावर, पोळीवर तूप घेताना दचकू लागले. आलेल्या हार्ट अटॕकला तूपाला जबाबदार धरून बिना तेलतूपाचे खाताना घरी तूप बनवण्याची परंपरा मोडून बाजारातले सोन्याच्या भावातले आॕलीव आॕईल (तेही व्हर्जिन म्हणजे पहील्या धारेचे असेल तर आजूनच महाग ) वापरायला सुरूवात केली. आॕलीव आॕईल वापरणे म्हणजे तुम्ही स्टॕडर्ड ज्ञानी आहात असे समजले जाऊ लागले.
तर मंडळी खरोखर तूप ईतके वाईट आहे का ?
मुळात भारतीय तूप यावर काय संशोधन झालय. ? तूप वाईट आहे हे कॉर्डीयॉलॉजिस्ट जेंव्हा सांगतात तेंव्हा त्यांच्या पुस्तकातले फॕट विषयीचे संशोधन त्यांच्या डोक्यात असते. क्लॕरीफाईड बटर किंवा प्राणिज स्नेह म्हणून तुपाकडे पाहीले जाते.
पण आपण दही विरजून घुसळून लोणी काढून ते कढवून जे तूप बनवतो तसे तूप भारतीय ऊपखंडा व्यतिरिक्त कुठे बनवले जात असेल का हा संशोधनाचाच विषय आहे.
आता हे घराघरातलं लोणकढं तूप तेही जर गायीचे असेल तर आयुर्वेदाने सगळ्या फॕट्समधे सर्वोत्तम सांगितले आहे. तेलापेक्षाही.
तूप हे 'संस्कारस्य अनुवर्तनात' म्हणजे ज्या पदार्थासोबत द्याल त्याचे गुणधर्म वाढवते असे आहे , म्हणूनच आयुर्वेदामधे औषधीयुक्त अशा सिद्ध घृताचा वापर केलेला आहे.
नुसते तूप हे निरोगी माणसाने रोज जरूर खावे. भूक लागत नसेल तर जेवताना मधे थोडे तूप आणि सैंधव एकत्र करून खावे.आजारी माणसाने मात्र खावे की न खावे किती खावे हे वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे. कारण सामता असणार्या आजारात तूप नाही असे सांगितले आहे. नी सामता ही वैद्यालाच समजू शकते.
बर्याचशा कान नाक घश्याच्या रोगांमधे मूळव्याधीमधे स्मरणशक्ती टिकवण्यासाठी म्हणून तूपाची निवळी म्हणजे तूप बनवल्यावर वर जो पातळ भाग राहातो तो , ऊपचार म्हणून सांगितली आहे.
मात्र हृदयरोग डायबेटीस बिपी वगैरे जीवनशैलीच्या आजारात रोज दोन चमचे गायीचे लोणकढं तूप बिनधास्त खायला हरकत नाही. त्याने कोलेस्टेरॉल वगैरे काही वाढत नाही.
मी तूप खायचे की नाही अशी काहीजणांची शंका असेल तर तुमचा त्रास सांगा ईथेच. डॉक्टर (वैद्य ) स्वतःच येथे मार्गदर्शन करतील . फक्त तूप खावे की नाही हे विचारायला क्लिनिक ला प्रत्यक्ष यायचीही गरज नाही.
9226958538

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा