दुध पोषक की विष
30 वर्षांपूर्वी कुणी दुध पिणे आरोग्यदायी आहे का असे विचारले असते तर एकजात सर्वांनी हो म्हटले असते.
पण आता दुधाबद्दल ईतकी टोकाची मते तयार झाली आहेत की दूध हे पांढरं विष आहे असे म्हटले जाते. जे दूध लहानपणी पूर्णान्न होते ते मोठेपणी एकदम विषच कसे होईल बरे ?
आयुर्वेद म्हणतो या जगातल्या प्रत्येक पदार्थात अगदी विषारी पदार्थातही औषधी गुणधर्म असतात. पण योजकस्तत्र दुर्लभः म्हणजे ते युक्तीने वापरणार्यांची कमतरता असते.
मग आता ही युक्ती काय ती ऐकूया आणि दुध प्यायचे की नाही ते आपण आपलेच ठरवूया.
आपण जे रोज पितो त्या दुधामधे अर्थात गायीचे दुध श्रेष्ठ आहे. गायीचे दुध पोषक आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत ते पोषणाचे काम करत असते. मात्र हे दुध पचायला जड थंड आणि स्निग्ध गुणाचे असते. म्हणून मग ते कोणी घेऊ नये आणि कोणत्या आजारात घेऊ नये हे आधी बघू मग त्याचे फायदे पाहू.
दूध कधी पिऊ नये ?
▪️ताप आलेला असताना- पहील्या 7 दिवसात पिऊ नये .
▪️भूक लागत नाहीये अशी स्थिती असताना .
▪️अपचन होत असेल तर .
▪️शरीरात कुठेही सूज असेल तर
▪️त्वचा विकारांमधे
▪️पोटदुखी जुलाब होणे.
▪️खोकला
या आजारांमधे दूध प्यायचे नाहीये.
तसेच संतर्पणजन्य विकारांमधे म्हणजे वजन वाढलेले असताना पण दूध पिऊ नये. डायबेटीस मधे पण दुध आणि दुधाचे पदार्थ टाळायला सांगितले आहे.
कुणी प्यावे
▪️लहान मुले व कृश बारीक व्यक्ती
▪️गर्भिणी व बाळंतपणात.
▪️एखाद्या आजारपणातल्या अशक्तपणात .
▪️ रक्तस्त्राव होणार्या विकारांमधे
म्हशीचे दूध हे गायीच्या दुधापेक्षा पचायला जास्त जड असते. जास्त पोषक असते. त्यामुळे वजन वाढवायचे असेल तसेच रात्री झोपेसाठी म्हशीचे दूध प्यावे. अन्यथा गायीचे दूध केंव्हाही ऊत्तमच.
▪️दूध शक्यतो गरम करून साखर न घालता प्यावे.
▪️दुधासोबत कोणताही पदार्थ शक्यतो खाऊ नये. विशेषतः आंबट खारट पदार्थ दुधासोबत टाळावेतच. त्यामुळे हल्ली स्वैपाक करताना रेसिपीत दूध घालतात ते चुकीचे आहे.
▪️दूध व मीठ एकत्र घेऊ नये त्यामुळे दूध पाव दूध बिस्कीट खाणे पूर्णपणे चूक आहे.
▪️कोणतेही फळ दूधात घालून खाऊ नये. एकाच फळाचा अपवाद. आंबा दूधासोबत चालतो.
▪️दुधाचा थंड कफकर गुणधर्म कमी करण्यासाठी सुंठ आले दालचिनी वगैरे दुधातून घेणे चालते.
आयुर्वेदात दुधातून औषधेही सांगितली आहेत त्याला क्षीरपाक असे म्हणतात. अर्जुनसाल , लसूण , लेंडी पिंपळी , शुंठी वगैरे औषधी द्रव्ये दुधात ऊकळून विशिष्ट आजारात देतात. तसेच काही जलोदरासारख्या आजारात फक्त दूधावर राहाण्याचे ऊपायही सांगितले आहेत.
या विषयी अधिक माहीती हवी असल्यास क्लिनिक ला फोन करून विचारावे
हल्ली A1 A2 दूध वगैरे गोष्टींची फार चर्चा आहे. ती चर्चा ऊगाचच आपल्या मनातला गोंधळ वाढवाते. सोपं काय ? आपण ज्या भागात वर्षानुवर्षे राहातो त्या भागातले पदार्थ आपल्याला सवयीचे असतात. मग आपल्या देशी गायी आणि म्हशी शेळ्या आणि मेंढ्या आपल्याला सवयीच्या . रोजच्या साठी त्यांचे दूध पिणे केंव्हाही ऊत्तमच.
हार्मोन टोचून व्यवसायासाठी जास्त दूध निर्माण केले जाते जे शरीराला हानिकारक असते पण अलीकडे तोही अवेअरनेस वाढलेला आहे दूधाचा व्यवसाय करणार्यांमधे . तेंव्हा हार्मोनविरहीत दूध प्या.
ऊंट शेळी मेंढी हत्ती यांच्या दुधात औषधी गुणधर्म असतात ते पुढच्या भागात पाहू. तूर्तास गाय म्हैस शेळी मेंढी यांचे दूध असेल आणि तुम्हाला अतिपोषणाचा कोणताही आजार नसेल तर बिनधास्त दूध प्या. दूध पिताना साय बाजूला काढायला विसरू नका. त्या सायीपासून तयार होणारे तूपही तुम्ही बिनधास्त खाऊ शकताय हे आपण मागच्या तूपाच्या मेसेज मधे वाचलेच असेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा