सोमवार, २६ जून, २०२३

दही थंडगार की गरम ?

 थंडगार दही 


वाचल्यावरही ऊन्हाळ्यात गारेगार वाटले ना ? पण ते फ्रीजमधे ठेवल्याने गारेगार होते प्रत्यक्षात दह्याचा गुणधर्म ऊष्ण असतो. आधुनिक आहारशास्त्रात रोज दही खायला सांगितले आहे. पण आयुर्वेदाने मात्र कधी खावे कुणी खावे कधी खाऊ नये कुणी खाऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याच्यामागची दह्याच्या गुणधर्मानुसार कारणे पण सांगितली आहेत . आपण कारणांच्या खोलात न शिरता आधी हे पाहू कुणी खावे कधी खावे ? 

दही कुणी खावे ? 

▪️नुकतीच सर्दी झालेली असल्यास ( आश्चर्य वाटले ना ? पण जुनाट सर्दी किंवा सायनस असेल तरच खाऊ नये ) 

▪️एक प्रकारचा ताप ज्यात थंडी वाजून येते ( होय या तापात दही खा बिनधास्त ) 

▪️तोंडाची चव गेलेली असेल तर 

▪️मूळव्याधीमधे

▪️जुलाब झालेले असताना

▪️पाळी ऊशीरा किंवा अनेक महीने येतच नसेल तर

▪️गरोदरापणात 4 थ्या महीन्यात

▪️निद्रानाश 

▪️अशक्त पणा बारीकपणा

▪️सतत कुठेतरी दुखणे असणार्या वातविकारांत

होय होय दहीच खायचय वरच्या लोकांनी 


मग दही कुणी खायचं नाही बरं ? 

▪️जाड / स्थूल लोकांनी

▪️सूज येत असल्यास 

▪️कफ झालेला असल्यास 

▪️कुठूनही रक्तस्त्राव होत असताना

▪️त्वचा रोगात 

▪️डायबेटीसमधे

▪️जंत झालेले असतील तर

▪️तोंडात अल्सर्स झाले असतील तर..


बघा डायबेटीस ओबेसिटीत दही नको.


बाकी वरच्या कॕटॕगिरीत नसलेल्या  ऊरलेल्या लोकांनी काय करायचं ? 

त्यांनी शरद ग्रीष्म वसंत रूतू म्हणजे आॉक्टोबर हीट आणि ऊन्हाळा या काळात जरा कमीच खावे. बाकी पावसाळा हिवाळ्यात खावे.

शक्यतो दिवसा खावे रात्री खाऊ नये.

अशक्त बारीक माणसासाठी दही साखर तर टॉनीकवाले पक्वान्न बरं का ? 

या दह्याला टांगून ठेऊन पाणी काढून टाकले की चक्का म्हणतात . चक्का स्वरूपात त्याचे गुणधर्म वेगळे असतात .ते पुढच्या भागात पाहू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...