शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

निशा आमलकी योग



 

प्रमेह म्हणजे डायबिटीसची ट्रीटमेंट सांगताना सगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये या दोन द्रव्यांचे खूप महत्त्व सांगितलेलं आहे. निशा म्हणजे हळद आणि आमलकी म्हणजे आवळा या दोन्हीचा एकत्रित रित्या वापर करायला सांगितला आहे. 

 निशा आमलकी योग याबाबत सांगायचं तर हा योग प्रीडायबिटीस मध्ये म्हणजे HBA1c साडेसहाच्या आसपास असेल तर डायबिटीस ची कोणतीही औषध न घेता हा योग उपयोगी पडतो. तसेच तुमची डायबेटीस ची औषधी चालू असताना थोडी शुगर जास्त राहत असेल तर हा योग घेतल्याने 30-40 mg/dl ने साखर कमी व्हायला मदत होते.
 निशा आमलकी योगाचा फक्त शुगर कमी करणे हा उपयोग आहे का? तर नाही यापेक्षा त्याचा कितीतरी अधिक उपयोग होतो.
हळद ही रक्त शुद्धीकर आणि सूज कमी करणारी असल्यामुळे हळद जखम भरून आणायला उपयोगी पडते अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते रक्तवाहिन्यांची आतली सूज कमी करते आणि त्यामुळे डायबेटिसचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत जसे की रक्तवाहिन्या खराब करणे आणि त्यामुळेच पुढे जाऊन ब्लॉकेजेस होतात हे कॉम्प्लिकेशन टाळायचं काम हळद करणार आहे.
          आवळा हा तीनही दोषांचे बॅलन्स करणारा रसायन म्हणून सांगितलेला आहे. रसायन म्हणजे सगळ्याच अवयवांचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करणारा.
 जो आवळा नित्यनेमानी सेवन करतो तो शंभर वर्ष जगू शकतो. असे आवळ्याबाबत वर्णन आहे.
 आवळ्यावरती काही क्लीनिकल ट्रायल्स पण झाल्या आहेत. आधुनिक पद्धतीच्या संशोधनाअंती खालील गोष्टींसाठी आवळा उपयोगी पडतो असे लक्षात आले आहे 
 ▶️उपाशीपोटी आवळ्याचा ज्यूस प्यायला दिला असता 45 दिवसानंतर वजनामध्ये घट सापडलेली 
▶️ आवळ्यामध्ये अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी आहे 
▶️रक्तातली साखर पण कमी होते
▶️न्यूरोलॉजिकल पेन आवळ्याने कमी होते 

आवळा आणि हळद यांचे दोन्हीचे गुणधर्म एकत्र केले तर दोन्ही डायबिटीस मध्ये शुगर पण कमी करतात रक्तवाहिन्यांची सूज पण कमी करतात शरीरातली सूज कमी करतात जखम भरून काढतात त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहेत वजन कमी करतात कोलेस्ट्रॉल कमी करतात यकृताचे आरोग्य राखतात.
 डायबिटीस हा आजार सायलेंट किलर मानला जातो कारण तो शांतपणे सगळ्या अवयवांवर परिणाम करत असतो. आणि म्हणूनच आवळा आणि हळद एकत्रित रित्या जर डायबिटीस च्या पेशंटने सातत्याने घेतला तर डायबिटीस चे कॉम्प्लिकेशन रोखता येतील.
 अर्थात त्यासोबत रेगुलर तपासण्या आणि साखर नियंत्रणात असणे गरजेचे आहे.
आवळा ज्युस 15 मिली + 1 छोटा चमचा हळद
किंवा आवळा पावडर असेल तर आवळा पावडर आणि हळद प्रत्येकी 1 चमचा कोमट पाण्यात टाकून सकाळी उपाशीपोटी प्यावे.
 अधिक माहितीसाठी कॉल करा 
9226958538

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...