शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

कोरोनरी स्टेनोसिस - सामान्य भाषेत ब्लॉकेजेस

 


कोरोनरी स्टेनोसिस/ अथेरोस्क्लेरॉसीस - सामान्य भाषेत ब्लॉकेजेस 

ब्लॉकेजेस कसे तयार होतात त्याच्या पायऱ्या अशा आहेत

1. अथेरोस्क्लेरॉसीस ची सुरुवात रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तराला नुकसान होण्यापासून होते .रक्तवाहिनीच्या  आतील स्तराचे नुकसान  (Endothelium dysfuncion)खालील कारणांमुळे  होते:

  • उच्च रक्तदाब
  • मधुमेह
  • धूम्रपान
  • रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल
  • दीर्घकालीन दाह (chronic inflammation)

या एंडोथॅलियल डिसफंक्शन मुळे रक्तातले  फॅट आत म्हणजे रक्तवाहिनीच्या अस्तरात शिरू शकते . 

2. मेद व कोलेस्टेरॉल साचणे

  • LDL कोलेस्टेरॉल रक्तवाहिनीच्या भित्तीत शिरते
  • ते ऑक्सिडाईज होऊन अधिक घातक बनते
  • त्यामुळे दाह (  inflammation) वाढतो

3. दाहजन्य पेशींची वाढ

  • पांढऱ्या रक्तपेशी (monocytes) धमनीत प्रवेश करतात .त्या फोम सेल्स बनतात
  • यामुळे फॅटी स्ट्रिक तयार होतात (प्रारंभीची अवस्था)

4. अॅथेरोमॅटस प्लाक तयार होणे

  • स्मूथ मसल सेल्स वाढतात 
  • कोलेजन, तंतू जमा होतात , फायब्रस कॅप तयार होते
  • आत मेदयुक्त कोर (lipid core) तयार होतो

  •                      आता ईथे  आपले ब्लॉकेजेस तयार झाले . हे ब्लॉकेजेस रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तरात तयार झालेले आहेत , आता ते रक्तवाहिनीच्याआतल्या बाजूला वाढतात कि बाहेरच्या बाजूला वाढतात हेही पाहणे महत्वाचे ठरते. हे ब्लॉकेजेस बाहेरच्या बाजूला वाढले तर त्याला पॉझिटिव्ह रिमॉडेलिंग असे म्हणतात. हे बाहेरच्या बाजूला वाढलेले ब्लॉकेजेस अन्जिओग्राफी मध्ये दिसत नाहीत .ते फक्त CT अँजिओ  मध्ये दिसू शकतात , आणि हे ब्लॉकेजेस जास्त धोकादायक असू शकतात. (vulnerable )म्हणजे अँजिओग्राफी मध्ये टक्केवारी कमी असूनही रक्तवाहिनीमध्ये हार्ट अटॅक निर्माण करणारी घटना चालू असू शकते.

  •                    या विरुद्ध निगेटिव्ह रिमॉडेलिंग म्हणजे रक्तवाहिनीची  पोकळी व्यापणारे ब्लॉकेजेस .हे मात्र अँजिओग्राफी मध्ये दिसतात . . 



  •     या ब्लॉकेजेस वरती हळूहळू फायबरचे आवरण म्हणजे कॅप्सूल तयार होते .हे  आवरण जेवढे पातळ तेवढा ब्लॉक फुटण्याची शक्यता अधिक. जेवढे हे आवरण जाड तेवढे हे ब्लॉकेजेस स्टेबल असतात.

  • प्लाक फुटला तर काय होते ? रक्ताची  गुठळी तयार होते .अस्थिर प्लाक  फुटू शकतो. प्लेटलेट्स जमा होऊन रक्ताची गुठळी (thrombus) तयार होते .यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो. 

 पण हार्ट अटॅक काही प्रत्येक ब्लॉकेजेस च्या रुग्णांना येत नाही . 

 रक्तवाहीनीची पोकळी व्यापणारे ब्लॉकेजेस  झाल्यावर लक्षणे काय निर्माण होतात ? 

या रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस मुळे( निगेटिव्ह रिमॉडेलिंग मुळे ) अरुंद झाल्या तरी लगेच लक्षणे निर्माण करतीलच असे नाही. किंवा अमुक टक्के ब्लॉकेजेस म्हणजे अमुक लक्षण असेही त्याचे गणित नसते. 

या कोरोनरी म्हणजे हृदयाच्या या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा करित असतात . आपण विश्रांती अवस्थेत असताना आपल्या हृदयाला साधारण 250 मिली एवढे रक्त पुरते. ब्लॉकेजेस कितीही टक्के असले तरी एवढा रक्तपुरवठा रक्तवाहिन्यांकडून केला जातो त्यामुळे फारसे श्रम न करणाऱ्या व्यक्तीस कोणताच त्रास होत नाही .

आता काही शारीरिक श्रम करताना हृदयाला ( मायोकार्डियम ) दुप्पट ते चौपट रक्तपुरवठा गरजेचं असतो. मग या रक्तवाहिन्यांचे विस्फारण  होते आणि तेवढा अतिरिक्त रक्तपुरवठा केला जातो. इथे हे ब्लॉकेजेस लक्षणे निर्माण करू शकतात . कसे ? या ब्लॉकेजेस मुळे रक्तवाहिन्यांची विस्फारण क्षमता बरेचदा कमी झालेली असते. यामुळे तुमच्या श्रमानुसार  म्हणजे मागणीनुसार पुरवठा झाला नाही तर ?? तर काय होईल ?? हृदयाला  ( मायोकार्डियम )  रक्तपुरवठा कमी होईल . याला वैद्यकीय भाषेत ischemia असे म्हणतात. श्रमाच्या वेळेस असा रक्तपुरवठा कमी पडला कि श्रम केल्यावर दम लागणे ,छाती जड पडणे, छातीत दुखणे ,थकवा येणे किंवा धडधड होणे अशी लक्षणे दिसतात. विश्रांती घेतली कि हि लक्षणे लगेच थांबतात.

म्हणजे ब्लॉकेजेस मुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ISCHEMIA होऊ शकतो.

हृदय रोगावर ट्रीटमेंट करताना ब्लॉकेजेस कसे होतात हे समजल्यानंतर ते कमी कसे करायचे आणि ते स्टेबल कसे करायचे हे समजणे सोपे जाईल. तसेच ब्लॉकेजेस मुळे होणाऱ्या ISCHEMIA वरही आपल्याला काम करता येईल .

पण त्याआधी हे ब्लॉकेजेस आपल्याला नक्की कोणत्या तपासण्या करून समजणार आहेत ? फक्त अँजिओग्राफय पुरेशी आहे का हे पाहू या .

9226958538

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

निशा आमलकी योग



 

प्रमेह म्हणजे डायबिटीसची ट्रीटमेंट सांगताना सगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये या दोन द्रव्यांचे खूप महत्त्व सांगितलेलं आहे. निशा म्हणजे हळद आणि आमलकी म्हणजे आवळा या दोन्हीचा एकत्रित रित्या वापर करायला सांगितला आहे. 

 निशा आमलकी योग याबाबत सांगायचं तर हा योग प्रीडायबिटीस मध्ये म्हणजे HBA1c साडेसहाच्या आसपास असेल तर डायबिटीस ची कोणतीही औषध न घेता हा योग उपयोगी पडतो. तसेच तुमची डायबेटीस ची औषधी चालू असताना थोडी शुगर जास्त राहत असेल तर हा योग घेतल्याने 30-40 mg/dl ने साखर कमी व्हायला मदत होते.
 निशा आमलकी योगाचा फक्त शुगर कमी करणे हा उपयोग आहे का? तर नाही यापेक्षा त्याचा कितीतरी अधिक उपयोग होतो.
हळद ही रक्त शुद्धीकर आणि सूज कमी करणारी असल्यामुळे हळद जखम भरून आणायला उपयोगी पडते अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते रक्तवाहिन्यांची आतली सूज कमी करते आणि त्यामुळे डायबेटिसचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत जसे की रक्तवाहिन्या खराब करणे आणि त्यामुळेच पुढे जाऊन ब्लॉकेजेस होतात हे कॉम्प्लिकेशन टाळायचं काम हळद करणार आहे.
          आवळा हा तीनही दोषांचे बॅलन्स करणारा रसायन म्हणून सांगितलेला आहे. रसायन म्हणजे सगळ्याच अवयवांचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करणारा.
 जो आवळा नित्यनेमानी सेवन करतो तो शंभर वर्ष जगू शकतो. असे आवळ्याबाबत वर्णन आहे.
 आवळ्यावरती काही क्लीनिकल ट्रायल्स पण झाल्या आहेत. आधुनिक पद्धतीच्या संशोधनाअंती खालील गोष्टींसाठी आवळा उपयोगी पडतो असे लक्षात आले आहे 
 ▶️उपाशीपोटी आवळ्याचा ज्यूस प्यायला दिला असता 45 दिवसानंतर वजनामध्ये घट सापडलेली 
▶️ आवळ्यामध्ये अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी आहे 
▶️रक्तातली साखर पण कमी होते
▶️न्यूरोलॉजिकल पेन आवळ्याने कमी होते 

आवळा आणि हळद यांचे दोन्हीचे गुणधर्म एकत्र केले तर दोन्ही डायबिटीस मध्ये शुगर पण कमी करतात रक्तवाहिन्यांची सूज पण कमी करतात शरीरातली सूज कमी करतात जखम भरून काढतात त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहेत वजन कमी करतात कोलेस्ट्रॉल कमी करतात यकृताचे आरोग्य राखतात.
 डायबिटीस हा आजार सायलेंट किलर मानला जातो कारण तो शांतपणे सगळ्या अवयवांवर परिणाम करत असतो. आणि म्हणूनच आवळा आणि हळद एकत्रित रित्या जर डायबिटीस च्या पेशंटने सातत्याने घेतला तर डायबिटीस चे कॉम्प्लिकेशन रोखता येतील.
 अर्थात त्यासोबत रेगुलर तपासण्या आणि साखर नियंत्रणात असणे गरजेचे आहे.
आवळा ज्युस 15 मिली + 1 छोटा चमचा हळद
किंवा आवळा पावडर असेल तर आवळा पावडर आणि हळद प्रत्येकी 1 चमचा कोमट पाण्यात टाकून सकाळी उपाशीपोटी प्यावे.
 अधिक माहितीसाठी कॉल करा 
9226958538

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

सफरचंद


Eat apple a day keep doctors away 

ही म्हण सर्वांना अगदीच परिचित आहे.आयुर्वेदात सफरचंद या फळाबद्दल तशी कमी माहिती आहे. पण पाश्चात्य जगतात या फळाबद्दल भरपूर संशोधन झालेले सापडते. ते संशोधन वाचल्यावर तुम्हीही म्हणाल चला रोज सफरचंद खाऊया.

▪️सफरचंद चावून खाल्ल्याने दातांना कीड लागण्याचे प्रमाण कमी होते.

▪️सफरचंद हे neuroprotective असते त्यामुळे अल्झायमर  आणि डीमेंशिया हे आजार दूर राहण्यास मदत होते.

▪️सफरचंद चवीला गोड असले तरीही त्यात अँटी ऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल मुळे रक्तातली साखर वापरली जाऊन ती कमी होण्यास मदत होते

▪️सफरचंद खाल्याने तृप्ती (satiety ) येते व भूक कमी होते  तसेच सफरचंदात फायबर अधिक असल्याने वजन कमी करणाऱ्याने जरूर सफरचंद खावे.

▪️लिपिड म्हणजे रक्तातला मेद कमी होतो. आणि चांगले कोलेस्टे्रोल HDL वाढते.

▪️वेदनाहरण आणि जंतूनाशक गुणधर्म असल्याने कोणत्याही आजारपणात ते जरूर खावे

▪️चक्क डिप्रेशन मधेही सफरचंद उपयोगी पडते. येथे रोज सफरचंदचा ज्यूस प्यावा.


चला तर मग रोज एक सफरचंद खा डॉक्टर ला दूर ठेवा.

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

PCOD /PCOS- कारणे , लक्षणे , उपाय

                                         


 नव्या युगातील बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण स्त्रियांमध्ये आढळणारा हा मोठ्या प्रमाणात दिसणारा आजार आहे. आणि इन फर्टीलिटी चे एक मोठे कारण आहे.

PCOD म्हणजे नक्की काय?

          यामध्ये या स्त्रीच्या ओव्हरी चा आकार वाढतो आणि त्यामध्ये सिस्ट तयार होतात. त्यामुळे त्यातून हार्मोन चा बॅलन्स बिघडून स्त्री बीज निर्मिती होत नाही.(LH is icreased and FSH is decreased )

              याचे प्रमुख कारण हे चुकीचा आहार होय. अति प्रमाणात गोड आणि मैद्याचे बेकरीचे पदार्थ तळलेले पदार्थ खाणे , कर्बोदके जास्त प्रमाणात खाणे . फळे भाज्या असें फायबरयुक्त पदार्थ  आहारात कमी प्रमाणात असणे. व्यायामाचा अभाव. त्यातून शरीरातील फॅट चे प्रमाण वाढून इन्सुलिन रेसिस्टन्स येतो आणि हार्मोनचे संतुलन बिघडते.

अशा स्त्रियांमध्ये खालील लक्षणे आढळतात.

▪️अनियमित पाळी किंवा पाळीत अंगावरून खुप जाणे किंवा कमी जाणे

▪️वजन वाढणे(ओबेसिटी )

▪️मानेच्या मागच्या बाजूस मांडीच्या /आतल्या बाजूस/ काखेत त्वचा काळसर होणे. Dark skin bands 

▪️हनुवटी किंवा छातीवर केस उगवणे

▪️केस गळणे

PCOD कडे दुर्लक्ष केल्यास पुढे इन्सुलिन resistance मुळेडायबेटीस होऊ शकतो , रक्तदाब वाढू शकतो

उपाययोजना

आहारात बदल- कर्बोदके कमी घेणे , बेकारीचे पदार्थ तळलेले पदार्थ गोड पदार्थ बंद करणे . फळे भाज्या यांचा आहारात समावेश करावा .जंक फूड टाळावे 

नियमित व्यायाम - चालणे , सायकलिंग , पोहोणे , सूर्यनमस्कार , एरोबिक्स यापैकी काहीही एक नियमित करावे 

गरज पडल्यास औषधे आणि पंचकर्म . पंचकर्म आणि वनस्पतीज औषधे हार्मोनचे  संतुलन करायला उपयोगी पडतात . तज्ञ वैद्य यांना दाखवून मगच चालू करावे 


For

Free diet Consultation for PCOD 

Guidance based on Ayurveda

Call

नाशिक माधवबाग- 9226958538

डॉ.आनंदी साठ्ये - M.D.( AYURVED )




गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

अभ्यंग - परंपरा नव्हे आरोग्य

दिवाळी आणि अभ्यंग स्नान असे समीकरण लहानपणापासून मनात बसलेले असते.पण आयुर्वेदाने मात्र हे अभ्यंग दिवाळीपुरते न ठेवता नित्य म्हणजे नेहमी करायला सांगितले आहे.
             आता अभ्यंग म्हणजे नक्की काय ? तर तेलाने केलेला पूर्ण शरीराचा मसाज. अभ्यंग स्नेहन. 
हे शरीरावर कसे काम करते ते पाहूया.  सुश्रूत नावाच्या ग्रंथकाराने अभ्यंगाचा परीणाम त्या त्या धातूपर्यंत पोचवण्यासाठी किती काळ मसाज करावा हेही सांगितले आहे. म्हणजे किती वेळ मसाज केला कि शेवटपर्यंत पोहोचेल ? त्याच्या फार तांत्रीक डिटेलमधे न जाता येवढे लक्षात ठेऊ या किती आंगावरच्या केसांपासून हाडांमधल्या मगजापर्यंत पोचायला 65 सेकंदांपासून ते 285 सेकंदांपर्यंतचा कालावधी लागतो. या हिशेबाने सर्व शरीराच्या सूक्ष्म स्तरापर्यंत जाण्यासाठी 30 ते 35 मिनीटांचा कालावधी पुरेसा आहे.    
आता मुद्दा असा आहे की हे तेल खारच आतपर्यंत मुरते का ? 
आधुनिक शास्त्रानुसार शरीरातले सेल मेंब्रेन हे लिपीड आणि प्रोटीन यांनी बनलेले असते . मसाज आॕईल हे लिपीड असल्याने त्वचेमधून पटकन शोषले जाते. यामधे बरीच मतमतांतरे असली तरी आयुर्वेदात हजारो वर्षांपासून अभ्यंग स्नेहनाचा वापर स्वास्थ्यरक्षणासाठी आणि ऊपचार म्हणूनही केला जातो.
जेंव्हा अभ्यंग केले जाते तेंव्हा अनेक गोष्टी शरीरावर काम करतात. मसाज करताना दिले जाणारे प्रेशर , स्पर्श , तेलामधली औषधे ई. सर्वच गोष्टी या शरीरावर परिणाम करत असतात .अभ्यंग हे आरोग्यासाठी करतो आहे की ऊपचार म्हणून यावर दिले जाणारे प्रेशर, मसाजचा कालावधी आणि औषधी तेलाचा प्रकार हे बदलत असतात. 
साध्या तीळतेलाच्या अभ्यंगाने शरिरावर काय परीणाम होतात हे पाहू ? 
1. जराश्रमवातहा - म्हणजे नियमित अभ्यंग हे म्हातारपण लांब ठेवते. श्रम दूर करते . वाढलेला वात दूर करते वात म्हणजे शरीराची झीज किंवा ठिकठिकाणचे दुखणे. झीज कमी होते आणि स्नायू सांधे यांचे दुखणे कमी होते 
2. दृष्टीप्रसादपुष्ट्यायु - दृष्टी सुधारते. आयु पुष्टी येते म्हणजे ताकद वाढून आहे त्यापेक्षा कमी वय वाटू        लागते. 
3. स्वप्नसुत्वक्दार्ढ्यकृत- शांत झोप लागते . त्वचेचा लूझनैस कमी होतो.सुरकुत्या कमी होतात. 
आता हेच अभ्यंग तैल औषधी युक्त घेतले तर ऊपचार म्हणून ऊपयोगी पडते . वाढलेल्या वयातील झिजलेल्या स्नायूंवर टेंडॉन सांधे लीगॕमेंट यांच्या दुखण्यावर सांध्यांच्या दुखण्यावर त्या त्या दुखण्यात झालेले बदल बघून वैद्य ठरवतात कि अभ्यंगासाठी कोणते तेल वापरावे . 
नुकताच मार लागला असेल , अचानक सूज आली असेल आणि ती ठसठसत असेल तर मात्र मसाज करू नये मात्र मार लागून अनेक दिवसानंतर दुखणे तसेच राहिले असेल तर त्यावेळेस स्नेहानाचा उपयोग होते. तसेच ताप सर्दी खोकला असे infectious disease झाले असतील तर मसाज करू नये.
अभ्यंगानंतर स्वेदन केले तर स्नेहनाचे फायदे वाढतात. घराच्या घरी अभ्यंग करत असाल तर अभ्यंगानंतर गरम पाण्याने स्नान करावे. 
अभ्यंगासाठी वेळ नसेल तर हिवाळ्यात तेल लाऊन अंघोळ करावी , आठ पंधरा  दिवसाने आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये जाऊन करून घ्यावे. 
लक्षात ठेवण्याची गोष्ट अभ्यंग करावे-
To relax body and mind
To relieve muscle pain 
To strengthen ligament, muscle, joints and tendons 
To improve skin quality and skin complexion 
Dr Anandi Sathaye
MD Ayurved

9226958538

सोमवार, २६ जून, २०२३

ताक पृथ्वीवरचे अमृत

तक्रं शक्रस्य दुर्लभम् - ईंद्राला दुर्लभ असे ताक पृथ्वीवरच्या मर्त्य मानवासाठी मात्र अमृताप्रमाणे आहे. 

आयुर्वेदाने दही रोज खाऊ नये असे म्हटले आहे . पण त्याच दह्यापासून बनवलेले ताक मात्र तुम्ही सकाळ संध्याकाळ प्यायले तरी चांगले आहे. कारण दह्यामधे दुप्पट पाणी घालून घुसळण्यामुळे ते पचायला हलके होते. 

ताक जेवणाच्या आधी नंतर कसेही प्यायले तरी चालते. फक्त ते किंचित आंबट असल्याने पित्त झालेले असताना आणि दुपारी पिऊ नये.


*ताक कुणी प्यावे*

 

सर्व स्त्री पुरूष आबालवृद्ध 


*कोणत्या आजारपणात ताक चालते ?* 

शरीरावर सूज येणे 

जलोदर 

मूळव्याध 

तोंडाला चव नसणे 

ग्रहणी किंवा IBS 

अपचन

वातविकार

रक्त कमी असणे (anemia )


*ताक केंव्हा पिऊ नये* 

पित्त झालेले असताना

जखमी अवस्थेत

अशक्तपणा आलेला असताना

चक्कर येत असताना


हिवाळ्यात पावसाळ्यात रोज प्यावे . ऊन्हाळ्यात कमी प्यावे. ताक हे थंडगार नसून ते ऊष्ण असते. त्यामुळेच ते पचनाला मदत करते. 


आधुनिक आहारशास्त्रानुसार एक कपभर ताकात (245 ml ) जवळजवळ 8 ग्रॕम प्रोटीन असते. Vit D कॕलशियम आणि पोटॕशियमही असते. 


आणि म्हणूनच ऊपासाच्या दिवशी फक्त ताक प्यायले तरी चालते. किंबहुना वजन कमी करताना फक्त ताक पिऊन लंघन करण्याचा फायदा होतो. 


ईंद्राला न मिळणारे ताक रोज प्या आणि आरोग्याच्या स्वर्गसुखाचा लाभ घ्या 

@नाशिकमाधवबाग

आरोग्यासाठी संपर्क

9226958538

दही थंडगार की गरम ?

 थंडगार दही 


वाचल्यावरही ऊन्हाळ्यात गारेगार वाटले ना ? पण ते फ्रीजमधे ठेवल्याने गारेगार होते प्रत्यक्षात दह्याचा गुणधर्म ऊष्ण असतो. आधुनिक आहारशास्त्रात रोज दही खायला सांगितले आहे. पण आयुर्वेदाने मात्र कधी खावे कुणी खावे कधी खाऊ नये कुणी खाऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याच्यामागची दह्याच्या गुणधर्मानुसार कारणे पण सांगितली आहेत . आपण कारणांच्या खोलात न शिरता आधी हे पाहू कुणी खावे कधी खावे ? 

दही कुणी खावे ? 

▪️नुकतीच सर्दी झालेली असल्यास ( आश्चर्य वाटले ना ? पण जुनाट सर्दी किंवा सायनस असेल तरच खाऊ नये ) 

▪️एक प्रकारचा ताप ज्यात थंडी वाजून येते ( होय या तापात दही खा बिनधास्त ) 

▪️तोंडाची चव गेलेली असेल तर 

▪️मूळव्याधीमधे

▪️जुलाब झालेले असताना

▪️पाळी ऊशीरा किंवा अनेक महीने येतच नसेल तर

▪️गरोदरापणात 4 थ्या महीन्यात

▪️निद्रानाश 

▪️अशक्त पणा बारीकपणा

▪️सतत कुठेतरी दुखणे असणार्या वातविकारांत

होय होय दहीच खायचय वरच्या लोकांनी 


मग दही कुणी खायचं नाही बरं ? 

▪️जाड / स्थूल लोकांनी

▪️सूज येत असल्यास 

▪️कफ झालेला असल्यास 

▪️कुठूनही रक्तस्त्राव होत असताना

▪️त्वचा रोगात 

▪️डायबेटीसमधे

▪️जंत झालेले असतील तर

▪️तोंडात अल्सर्स झाले असतील तर..


बघा डायबेटीस ओबेसिटीत दही नको.


बाकी वरच्या कॕटॕगिरीत नसलेल्या  ऊरलेल्या लोकांनी काय करायचं ? 

त्यांनी शरद ग्रीष्म वसंत रूतू म्हणजे आॉक्टोबर हीट आणि ऊन्हाळा या काळात जरा कमीच खावे. बाकी पावसाळा हिवाळ्यात खावे.

शक्यतो दिवसा खावे रात्री खाऊ नये.

अशक्त बारीक माणसासाठी दही साखर तर टॉनीकवाले पक्वान्न बरं का ? 

या दह्याला टांगून ठेऊन पाणी काढून टाकले की चक्का म्हणतात . चक्का स्वरूपात त्याचे गुणधर्म वेगळे असतात .ते पुढच्या भागात पाहू.

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...